ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत घट; मात्र 53 जणांचा मृत्यू  

corona-test-lab
corona-test-lab

ठाणे ः ठाणे जिल्ह्यात बाधित रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी (ता.28) दिवसभरात जिल्ह्यात कोरोनाच्या एक हजार 209 रुग्णांची तर, 53 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्ण संख्या 81 हजार 250 झाली तर, मृतांची संख्या आता दोन हजार 242 झाली आहे. 
जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली महानगर पालिकाक्षेत्रात 207 रुग्णांची तर, 10 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 19 हजार 32 तर, मृतांची संख्या 326 इतकी झाली आहे.

ठाणे महानगर पालिका हद्दीत 191 बाधितांची तर, 9 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्यामुळे बाधितांची संख्या 18 हजार 149 तर, मृतांची संख्या 608 वर गेली आहे. नवी मुंबई महापालिकेत 320 रुग्णांची तर, 8 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या 14 हजार 252 तर, मृतांची संख्या 402 वर पोहोचला आहे. मीरा भाईंदरमध्ये 156 रुग्णांची तर, 5 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 7 हजार 838 तर, मृतांची संख्या 261 इतकी झाली आहे. भिवंडी महापालिका क्षेत्रात 38 बधितांची तर, 4 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 3 हजार 543 तर, मृतांची संख्या 194 वर पोहोचली. उल्हासनगर 50 रुग्णांची तर, 3 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 6 हजार 588 तर, मृतांची संख्या 119 झाली आहे.

अंबरनाथमध्ये 21 रुग्णांची तर, 4 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 3 हजार 609 तर, मृतांची संख्या 144 वर गेली आहे. बदलापूरमध्ये 41 रुग्णांची तर, 3 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 2 हजार 401 तर, मृतांची संख्या 44 इतकी झाली. तर, ठाणे ग्रामीण भागात 185 रुग्णांची तर, 7जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 5 हजार 838 तर, मृतांची संख्या 144 वर गेली आहे. 

महापालिका क्षेत्र रुग्ण संख्या मृत्यू 
ठाणे 191 09 
कल्याण डोंबिवली 207 10 
नवी मुंबई 320 08 
मीरा भाईंदर 156 05 
भिवंडी 38 04 
उल्हासनगर 50 03 
अंबरनाथ 21 04 
बदलापूर 41 03 
ठाणे ग्रामीण 185 07  

(संपादन ः रोशन मोरे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com