
कोविडच्या भिती आणि लॉकडाऊन मुळे मुंबईतील पाणी जन्य रुग्णांच्या संख्येत प्रचंड घट झाले आहे.
मुंबई : कोविडच्या भिती आणि लॉकडाऊन मुळे मुंबईतील पाणी जन्य रुग्णांच्या संख्येत प्रचंड घट झाले आहे. या वर्षात हेपॅटायटिस (काविळ) ए व ई च्या रुग्णसंख्येत 83.60 टक्के आणि गॅस्ट्रोच्या रुग्णसंख्येत 68.04 टक्क्यांनी घट झाली आहे. हे आजार प्रामुख्याने दुषित पाणी, उघड्यावरचे खाणे, हाताची स्वच्छता न राखणे यामुळे होतात.
BMCचे वराती मागून घोडे! "अग्निशमन'च्या उपकेंद्रानंतर निवासस्थान व कार्यालयाची दुरुस्ती
जानेवारी ते नोव्हेंबर 2019 मध्ये हेपॅटायटीस ए आणि ईचे 1 हजार 494 रुग्ण होते. तर,2020 मध्ये नोव्हेंबर पर्यंत 245 रुग्ण आढळले आहेत.तर,2019 मध्ये जानेवारी ते नोव्हेंबर या 11 महिन्यांच्या काळात गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या 7 हजार 247 होती. तर,2020 या 11 महिन्यात 2 हजार 316 रुग्ण आढळले आहेत. अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
देशात सर्वात स्वच्छ पिण्याचे पाणी मुंबई शहरात मिळते.याबद्दल केंद्र सरकारनेही मुंबई महानगर पालिकेचा गौरव केलाच आहे.त्याच बरोबर कोविड काळात केल्या जात असलेल्या जनजागृतीमुळे वैयक्तीक स्वच्छता पाळण्याचे प्रमाणे वाढले आहे.यात प्रामुख्याने वारंवार हात धुतले जातात अथवा सॅनिटाईज केले जातात.तसेच,लॉकडाऊन मध्ये शिथीलता मिळाल्यानंतर खाऊ गल्या सुरु झाल्या असल्या तरी त्यात पुर्वी प्रमाणे वर्दळ नसते.त्याच बरोबर घरातही आता उकळलेली पाणी पिण्याची आणि बाहेरील पाणी न पिण्याची सवय नागरीकांनी अंगीकारली आहे.महापालिकेकडून चांगल्या दर्जाचे पाणी नागरीकांना पुरवले जाते.त्याच बरोबर कोविड प्रतिबंधासाठी होत असलेल्या जनजागृती मुळे नागरीकांनाही सातत्याने हात धुणे,उघड्यावरचे अन्न खाणे टाळले आहे. तसेच, शुध्द पाणी पिण्यास प्राधान्य देत आहे.त्याचाही हा परीणाम असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
1 डिसेंबरपासून विशेष ट्रेन्सच्या वेळापत्रकात बदल; थांब्यांमध्येही फेरबदल होणार
पावसाळ्यात घटले गॅस्ट्रोचे रुग्ण
पावसाळ्याच्या काळात दुषीत पाण्याची समस्या वाढते.यामुळे प्रामुख्याने गॅस्ट्रोच्या रुग्णांची वाढ होते.गेल्या वर्षी जुन महिन्यात 777 जुलैमध्ये 994 आणि ऑगस्ट मध्ये 623 रुग्ण आढळले होते.तर,यंदा ही संख्या जुन मध्ये 40,जुलै मध्ये 56 आणि ऑगस्ट मध्ये 53 पर्यंत खाली आहे.त्याच बरोबर मे महिन्यात उन्हाचा दाह वाढत असल्याने रस्त्यावरचे सबरत उघडी फळे,बर्फाचा गोळा खाण्याचे प्रमाण वाढते त्यामुळे या महिन्यातही गॅस्ट्रोचे रुग्ण वाढतात.गेल्या वर्षी मे महिन्यात 730 रुग्ण होते.तर,यंदा 61 रुग्णांची नोंद झाली आहे.
-------
2015 ते 2020 पर्यंत पहिल्या जानेवारी ते नोव्हेंबर या काळातील गॅस्ट्रोचे रुग्ण
-2015 -- 10257
- 2016--9462
- 2017-- 7911
- 2018--7315
- 2019--7247
-2020--2316
---------------
2015 ते 2020 पर्यंत जानेवारी ते नोव्हेंबर या काळातील काविळचे रुग्ण
-2015--1075
- 2016--1425
- 2017 -- 1105
-- 2018--1074
- 2019 ---1494
-2020 --- 245
----------------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )