Maharashtra Cyber Crime: मोबाईलवरुन पैशांचे व्यवहार करताना सावधान! दररोज होतेय २ कोटी रुपयांची फसवणूक

Maharashtra Crime: गेल्या साडेतीन वर्षांत २३८० कोटींची फसवणूक, २२२ कोटी रुपये गोठविण्यत यश
: मोबाईलवरुन पैशांचे व्यवहार करताना सावधान! दररोज होतेय २ कोटी रुपयांची फसवणूक
Maharashtra Cyber Crimesakal

Mumbai : सायबर भामटे राज्यातील नागरिकांची दर दिवसाला सुमारे दोन कोटी रुपयांची फसवणूक करत आहेत, अशी धक्कादायक माहिती सायबर महाराष्ट्रने जारी केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

२०२१ पासून या वर्षी १५ मेपर्यंत राज्यभर दाखल झालेल्या सायबर किंवा ऑनलाईन फसवणुकीच्या विविध प्रकारच्या गुन्ह्यांत राज्यातील नागरिकांचे एकूण २३८० कोटी रुपये भामट्यांनी परस्पर आपल्या खिशात घातले. त्यापैकी फक्त २२२ कोटी, सुमारे १० टक्के रक्कम वाचविण्यात किंवा गोठविण्यात सायबर पोलिसांनी यश आले आहे.

फसवणुकीची रक्कम परत कशी मिळते?

फसवणूक झाल्याझाल्या तीन तासांच्या आत सायबर पोलिसांकडे तक्रार केल्यास तातडीने गुन्हे नोंद होतात भामट्यांनी ज्या बँक खात्यावर रक्कम स्वीकारली आहे ते खाते गोठविण्यासाठी संबंधित बँकेच्या समन्वय अधिकाऱ्याला( नोडल ऑफिसर) सूचना केली जाते. बँक खाते गोठविल्याने फसवणुकीची रक्कमही गोठते आणि ती तक्रारदारास परत मिळते.

अडचणी काय?

सायबर महाराष्ट्रचे पोलीस उप महानिरीक्षक(डीआयजी) संजय शिंत्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार रिझर्व्ह बँकेने सर्व बँका, पतसंस्थांना २४ तास कर्तव्यावर असेल असा समन्वय अधिकारी नेमण्याचे आदेश दिले आहेत. मात्र देशातील शहरी भाग सोडल्यास ग्रामीण भागात पूर्णवेळ समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक झालेली नाही. कुठे अधिकारीच नाही तर कुठे २४ तास उपलब्धता नाही. त्यामुळे तीन तासांच्या आत तक्रार येऊनही बँक खाती गोठविता येत नाहीत.

अनेकदा नागरिकांना आपली फसवणूक झाली हे लगेच लक्षात येत नाही. काही नागरिक समाजात बदनामी होईल या उद्देशाने तक्राr देत नाहीत. अनेकांना कुठे तक्रार करावी याबाबत माहिती नसते. या परिस्थितीत तीन तास उलटतात आणि भामट्यांचे पुढील बँक व्यवहार रोखणे, गोठवणे अशक्य होते.

१९३० वर संपर्क साधा

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तत्काळ १९३० या सायबर महाराष्ट्राच्या हेल्पलाईनवर संपर्क साधावा. या हेल्पलाईनवर दिवसाला अडीच ते तीन हजार व्यक्ती संपर्क साधत आहेत. या क्रमांकावर एकाचवेळी आलेले २३ कॉल ' अटेंड ' केले जाऊ शकतात. याशिवाय www. cybermaharashtra.gov.in या संकेतस्थळावरही नागरिक आ तक्रार नोंदवू शकतात. दिवसाच्या कोणत्याही प्रहरी सायबर महाराष्ट्र कार्यालयात ११० अधिकारी, कर्मचारी कार्यरत असतात.

फसवणूक टाळण्यासाठी

ऑनलाईन व्यवहाराचे ओटीपी, पीन क्रमांक, सीवीवी आदी तपशील कोणालाही देऊ नये. अनोळखी लिंक, ॲप डाऊनलोड करू नयेत. अनोळखी व्यक्तीच्या भुलथापांना बळी पडू नये.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com