#COVID19: राज्यातील रुग्णांची संख्या 868 वर पोहचली! नागरिकांनो काळजी घ्या

सकाळ न्यूज नेटवर्क 
सोमवार, 6 एप्रिल 2020

राज्यात सोमवारी कोरोनाच्या 120 नवीन रुग्णांची नोंद झाल्यामुळे एकूण संख्या 868 वर गेली. बरे झालेल्या 70 जणांना घरी सोडण्यात आले आहे. 

मुंबई: राज्यात सोमवारी कोरोनाच्या 120 नवीन रुग्णांची नोंद झाल्यामुळे एकूण संख्या 868 वर गेली. बरे झालेल्या 70 जणांना घरी सोडण्यात आले आहे. 

मुंबईतील महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
 

राज्यात आजपर्यंत 17 हजार 563 नमुन्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी 868 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आणि 15 हजार 808 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. सध्या राज्यात 32 हजार 521 व्यक्ती घरगुती आणि 3498 जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत. दरम्यान, सोमवारी राज्यात सात कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यापैकी चार रुग्ण मुंबईतील, प्रत्येकी एक जण नवी मुंबई, ठाणे व वसई-विरार येथील होता. कोरोनामुळे राज्यातील मृत्यूंची संख्या आता 52 झाली आहे. 

निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमात भाग घेतलेल्या राज्यातील व्यक्तींचा जिल्हा आणि महापालिका स्तरांवर शोध घेण्यात येत आहे. आतापर्यंत त्यांच्यापैकी आठ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले. त्यापैकी प्रत्येकी 2 जण पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नगर भागांतील आहेत, तर प्रत्येकी एक जण हिंगोली आणि वाशिम येथील आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी सकाळ ईपेपर वाचा 

The number of patients in the state reached 868


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The number of patients in the state reached 868