esakal | अखेर ठरलं ! 'या' दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार शपथ आमदारकीची शपथ

बोलून बातमी शोधा

UDHHAV THACKERAY

विधानपरिषदेचे नवे ९ आमदार अखेर आमदारकीची शपथ घेणार आहेत. अखेर या सर्वांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला आहे.   

अखेर ठरलं ! 'या' दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार शपथ आमदारकीची शपथ
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई -  ऐन कोरोनाच्या संकट काळात ज्या गोष्टीनं महाराष्ट्राचं वातावरण तापलं होतं  ती विधान परिषदेची निवडणूक अखेर बिनविरोध झाली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विधानपरिषदेचे इतर आमदार अखेर आमदारकीची शपथ घेणार आहेत.  या सर्वांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला आहे.   

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आमदार २८ मे च्या आतमध्ये विधिमंडळात जाणं बंधनकारक होतं. तसं जर झालं नसतं तर महाराष्ट्रात घटनात्मक पेच निर्माण झाला असता. अशात विधान परिषदेवर जाण्याचा उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतला.

यादरम्यान मोठं राजकीय नाट्य पाहायला मिळालं. महाविकास आघाडीनं राज्यपालांना अनेकदा विनंती करूनही राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना राज्यपालांच्या कोट्यातून आमदारकी जाहीर केली नाही. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संभाषणानंतर २१ मे ला विधानपरिषदेची निवडणूक जाहीर केली.

या दरम्यानही महाविकास आघाडीत जागांवरून कॉग्रेसच्या माध्यमातून दबावतंत्राचा वापर करण्यात आला. अखेर महाराष्ट्रातील विधान परिषदेची निवडणूक आता बिनविरोध होतेय. 

हेही वाचा: भीषण! येत्या सहा महिन्यात तब्बल ६ लाख लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता

बिनविरोध निवड करण्यात आलेल्या या सर्व ९ उमेदवारांचा शपथविधी १८ मे ला दुपारी १ वाजता होणार आहे.  या सर्व ९ उमेदवारांचा शपथविधी सोमवारी विधानपरिषदेत सभापतींच्या उपस्थित पार पडणार आहे. 

विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांचं विधानसभेचं संख्याबळ लक्षात घेऊन विधानसभेच्या सदस्यांची निवड केली जाते. प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराला २९ मतं मिळणं आवश्यक असतं.  यावेळी निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे शिवसेनेला २, राष्ट्रवादी काँग्रेसला २, काँग्रेसला १ तर भाजपला ४ उमेदवार विधानपरिषदेत पाठवण्याची संधी मिळाली आहे. 

हेही वाचा: महाविकास आघाडीच्या बैठकीत 'मोठा' निर्णय..महाराष्ट्रात ''या'' तारखेपर्यंत वाढणार लॉकडाऊन... 

हे उमेदवार घेतील शपथ:

शिवसेना:

-- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 
-- निलम गोऱ्हे 

काँग्रेस:

-- राजेश राठोड 

राष्ट्रवादी काँग्रेस:

-- शशिकांत शिंदे
-- अमोल मिटकरी

भाजप:

-- रणजितसिंह मोहिते पाटील
-- गोपीचंद पडळकर 
-- प्रवीण दटके 
-- रमेश कराड

oath taking ceremony of CM udhhav thackeray and 9 others has decided read full story