मागण्या मान्य करा नाहीतर, रस्त्यावर उतरू; ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंचा सरकारला इशारा 

पूजा विचारे
Tuesday, 15 September 2020

ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट केली. तसंच महाविकास आघाडी सरकारला इशारा देखील दिला आहे.

मुंबई: ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट केली. तसंच महाविकास आघाडी सरकारला इशारा देखील दिला आहे. धनगर आरक्षण मिळालं नाही तर महाविकास आघाडी सरकारला सळो की पळो करुन सोडू, असं शेंडगे म्हणालेत. तसंच ओबीसींची भूमिका ही नेहमीच मराठा आरक्षणाच्या समर्थनात आहे, मराठ्यांना वेगळे आरक्षण द्यावे, आमचा विरोध केवळ मराठा आरक्षणात ओबीसी आरक्षण देण्याला आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. 

प्रकाश शेंडगे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

 • मराठा आरक्षणामुळे या राज्यातील सामाजिक वातावरण ढवळून निघालं.
 • मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यावा आणि ओबीसीला धक्का लागता कामा नये अशी आमची भूमिका होती.
 • मराठा समाजाला मागास प्रवर्ग करण्यात आलं.
 • ओबीसी हे वेगळं नाही. हे आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकणार नाही असं आम्ही त्यावेळी म्हटलं होतं.  त्याचवेळी त्यावर उपाय योजना सुरू करायला सांगितल्या होत्या. त्यावेळी आमचं ऐकल नाही.
 • ओबीसी आणि भटक्या समाजाचं आरक्षण बेकायदेशीर आहे असं मराठी समाजाचे नेते बोलायला लागले आहेत.
 • आमचं आरक्षण बेकायदेशीर ठरवायचं हे योग्य नाही
 • मराठा नेते आता पक्षोभक भाषणं करत आहेत.
 • ओबीसी आणि भटके समाज हे मान्य करणार नाही.
 • घटनापीठाकडे हे आरक्षण गेले आहे. 
 • ईडब्लूयएसचं आरक्षण घेता येणार नाही हा जीआर मागे घ्यावा. किमान तो लाभ मराठा समाजातील गरीब युवकांना त्याचा होईल.
 • हे आरक्षण घटनापीठाकडे गेले आहे. तोर्यंत गरीब मराठा विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या दुरबल घेतलं म्हणून आरक्षण द्यावं.
 • बेरोजगारी वाढली आहे. मेगाभरती आता सुरू केली पाहिजे. ही भरती पेंडिंग आहे
 • 12% जागा मराठा समाजाला ठेवा 88% जागा भराव्यात.
 • धनगर समाजच्या आरक्षणाच वचन आम्हला मुख्यमंत्री यांनी दिलं आहे. त्याचा ही अध्यादेश काढण्यात यावा.
 • धनगर समाजाच्या आरक्षणाला मराठा समाजाच्या काही नेत्यांनी  न्यायालयात आव्हान दिले आहे.
 • मराठा समाजाच्या आरक्षणाला सरकारने जी वकिलांची फौज दिली तशीच फौज धनगर आरक्षणाला दिली पाहिजे. 
 • ओबीसी विद्यार्थ्यांचे हॉस्टेल सुरू नाही. 
 • अध्यादेश काढून आरक्षण देऊ शकता ही सूचना शरद पवार यांनी केली.
 • अध्यादेश काढून धनगर समाजाला आरक्षण द्यावे ही मागणी.
 • धनगर समाज आरक्षण पण कुणाचा विरोध नाही.
 • उद्धव ठाकरे यांनी पण आश्वासन दिलं होतं. त्या समाजास्तही अध्यदेश काढला पाहिजे.
 • महाराष्ट्रातील जातीय सलोखा कायम राहिला पाहिजे, नाहीतर संघर्ष अटळ आहे.
 • आमच्या मागण्या सरकाने 30 तारखेपर्यंत मान्य कराव्यात नाही तर आम्हला रस्त्यावर उतरावं लागेल.
 • obc leader prakash shendge Warning the government dhangar reservation


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: obc leader prakash shendge Warning the government dhangar reservation