मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलल्याने संतप्त झालेल्या ओबीसी नेत्यांनी भुजबळ यांना मंत्रिमंडळात सामावून घ्यावे, अशी मागणी आज झालेल्या ओबीसी जन मोर्चाच्या बैठकीत केली आहे. तसेच, पत्रकारांशी बोलताना भुजबळ यांनीही, ‘राज्यात माझी गरज आहे असे सांगून राज्यसभेत जाऊ दिले नाही. आता माझी गरज संपली का?,’ असा सवाल केला.