लठ्ठपणामुळे कोरोना रुग्णांच्या जीवाला धोका; वैद्यकीय तज्ज्ञांचे मत; वाचा सविस्तर

भाग्यश्री भुवड
Monday, 31 August 2020

स्थूलतेमुळे कोरोना रुग्णांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला असुन हे प्रमाण सध्या 50 टक्क्यांवर पोहोचले आहे.

मुंबई : स्थूलतेमुळे कोरोना रुग्णांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला असुन हे प्रमाण सध्या 50 टक्क्यांवर पोहोचले आहे. यामुळे, गुंतागुंत वाढत असुन मृत्यू ही होऊ शकतो, असे निरीक्षण तद्य डॉक्टरांनी मांडले आहे. अमेरिकेत केल्या गेलेल्या नव्या संशोधनानुसार, ही बाब समोर आली आहे. वैद्यकीय तद्यांच्या निरीक्षणानुसार, ह्रदयविकार, उच्च रक्तदाबाप्रमाणे स्थूलतेमूळेही कोरोना रुग्णांची प्रकृती गंभीर होत असल्याचे निरीक्षण आहे. 

सुशांत सिंह प्रकरणः काँग्रेसच्या आरोपानंतर भाजप आक्रमक, थेट केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र

गरोदर महिला, केमोथेरेपी सुरु असलेले कर्करुग्ण, प्रतिकारशक्ती कमी असलेले रुग्ण, 50 वर्षांवरील व्यक्ती, मधुमेही, फुप्फुस, हृदय किंवा मुत्रपिंडाचा क्रोनिक आजार असलेले आणि अति लट्ठपणा असलेलयांनी कोरोना काळात जास्त काळजी घेतली पाहिजे. कोरोना रुग्णाला हे आजार असतील तर गुंतागुंत अधिक वाढते. तर, स्थूलता अन्य आजारांवर आणखी परिणाम करण्याची शक्यता असते. 

 

लठ्ठपणाने ग्रासलेल्या कोविड पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये गुंतागुंत वाढण्याची शक्यता आहे. लठ्ठपणामुळे हृदयाच्या समस्या, उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाचा आजार, झोपेचा आजार, आतड्यांचे आजार, हृदयविकार तसेच वाढत्या वजनामुळे फुफ्फुसांवर येणारा ताण यासारख्या अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो आणि त्यामुळे कोविड सारख्या आजाराचा धोका वाढू शकतो. लट्ठपणा असलेल्या आणि कोरोना असलेल्या रुग्णांना आता मोठ्या प्रमाणात रुग्णालयात दाखल करुन घ्यावे लागत आहे. यात तरुणांचे ही वाढते प्रमाण आहे. 

डॉ. अपर्णा गोविल भास्कर,
बॅरिएट्रिक आणि लॅपरोस्कोपिक सर्जन अपोलो आणि ग्लोबल हॉस्पिटल, मुंबई

--------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Obesity threatens the lives of corona patients; Opinion of medical experts; Read detailed