esakal | मोठी बातमी - मंत्रालयातील प्रधान सचिवांना कोरोनाची लागण
sakal

बोलून बातमी शोधा

मोठी बातमी - मंत्रालयातील प्रधान सचिवांना कोरोनाची लागण

मंत्रालयात एका विभागाच्या प्रधान सचिवांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येतेय. परराज्यातील मजूर आणि राज्यात अडकलेल्या नागरिकांच्या व्यवस्थेसाठी मंत्रालयात स्थापन करण्यात आलेल्या सचिवांच्या विशेष गटात या अधिकाऱ्याचा समावेश होता.

मोठी बातमी - मंत्रालयातील प्रधान सचिवांना कोरोनाची लागण

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचा आकडा वाढताना पाहायला मिळतोय. कोरोनाची चेन तोडण्यासाठी देशात तिसरा लॉक डाऊन सुरु आहे. तरीही कोरोना रुग्णाची संख्या वाढतेच आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणात उपाययोजना राबवण्यात येतायत मात्र अशातही हवं तसं यश येताना पाहायला मिळत नाही. आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होतेय. रस्त्यावर २४ तास ड्युटी करणाऱ्या पोलिस बांधवाना कोरोनाची लागण होतेय. पत्रकारांना कोरोनाची लागण झालीये. अशात धक्कादायक बाब म्हणजे मंत्रालयात देखील आता कोरोनाने घुसखोरी केलीये.

Big News - चिंता वाढतेच आहे, 531 पोलिसांना कोरोनाची लागण...

मंत्रालयात एका विभागाच्या प्रधान सचिवांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येतेय. परराज्यातील मजूर आणि राज्यात अडकलेल्या नागरिकांच्या व्यवस्थेसाठी मंत्रालयात स्थापन करण्यात आलेल्या सचिवांच्या विशेष गटात या अधिकाऱ्याचा समावेश होता.  संबंधित अधिकाऱ्याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर आता  त्यांच्यासोबत काम करणाऱ्या सर्वांनाच क्वारंटाईन करण्यात आलं आहे. या आधीच मंत्रालयत पाच जण कोविड पॉझिटिव्ह आढळून आलेत. प्रधान सचिवांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आता मंत्रालयातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची आकडेवारी सहावर गेलीये. 

लालपरी निघाली ! आजपासून एसटीची मोफत सेवा; वाचा कुणाला आणि कुठे प्रवास करता येणार...

मुंबईत कोरोनाची भीषण परिस्थिती आहे. मुंबईतून दररोज मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण वाढताना पाहायला मिळतायत. सरकारतर्फे मोठ्या उपाययोजना देखील करण्यात येतायत. मात्र अशात आता जिथून या उपाययोजना राबवल्या जातायत त्या मंत्रालयात देखील कोरोना आपले पाय रोवतोय का असा प्रश्न आता उपस्थित होतोय. 

officer working in mantralaya detected positive mantralaya covid count goes on 6

loading image
go to top