अनधिकृत गॅरेजवर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना धक्काबुक्की; आरोपींना पोलिसांकडून अटक

सचिन सावंत
Thursday, 21 January 2021

मीरा भाईंदर पालिका कर्माचाऱ्यासह गोल्डन नेस्ट परिसरातील फुटपाथवर गॅरेजवर कारवाई करत असताना त्यांना व कर्मचाऱ्यांना धक्काबूक्की करण्यात आली

मिरा रोड ः भाईंदर पूर्वेकडील गोल्डन नेस्ट येथील बालाजी हॉस्पिटल परिसरात अनधिकृत गॅरेजवर कारवाई करण्याकरता गेलेल्या पालिका प्रभाग अधिकारी कांचन गायकवाड आणि कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करत धमकावून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात 4 जणांवर कलम गुन्हा दाखल करत आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. 

मीरा-भाईंदर महापालिका आयुक्त डॉ. विजय राठोड यांच्या आदेशानुसार प्रभाग क्रमांक 4 च्या प्रभाग अधिकारी कांचन गायकवाड या पालिका कर्माचाऱ्यासह गोल्डन नेस्ट परिसरातील फुटपाथवर गॅरेजवर कारवाई करत असताना त्यांना व कर्मचाऱ्यांना धक्काबूक्की करण्यात आली. गॅरजवर कारवाई करत असताना तेथील सामान पालिका कर्मचाऱ्यांनी जप्त केले.

मुंबई, ठाणे, पालघर परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

त्यावेळी गॅरेज चालकांनी त्याचा विरोध करत घटनास्थळी कारवाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना धमकावण्यास सुरुवात केली. याप्रकरणी प्रभाग अधिकारी कांचन गायकवाड यांनी नवघर पोलीस ठाण्यात तक्रार देताच पोलिसांनी गुन्हा दाखल करत सदर कारवाई केली. आरोपींना अटक केली असून याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण वंझारी करत आहेत.

officers taking action on unauthorized garages in mira road Accused arrested by police meera bhayandar marathi news

----------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: officers taking action on unauthorized garages in mira road Accused arrested by police meera bhayandar marathi news