esakal | इंटरनेट नसलेल्या ठिकाणी ऑफलाईन पेमेंट यंत्रणा ; रिझर्व्ह बँकेची घोषणा | Mumbai
sakal

बोलून बातमी शोधा

RBI

इंटरनेट नसलेल्या ठिकाणी ऑफलाईन पेमेंट यंत्रणा ; रिझर्व्ह बँकेची घोषणा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : देशभर जिथे इंटरनेट सेवा अस्तित्वात नाही किंवा इंटरनेट ची समस्या आहे तेथे डिजिटल पद्धतीने पैसे पाठवण्यासाठी ऑफलाईन पेमेंट यंत्रणा आणली जाईल, अशी घोषणा रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी आज येथे केली.ही यंत्रणा लौकरच देशभर लागू केली जाईल. ज्या ग्राहकांना इंटरनेट अभावी किंवा इंटरनेटची क्षमता पुरेशी नसल्याने डिजिटल माध्यमातून (यूपीआय, आयएमपीएस, आरटीजीएस) पैसे पाठवता येत नाहीत त्यांना ही पद्धती वापरता येईल.

या ऑफलाईन पद्धतीच्या चाचण्या घेण्याचा निर्णय मागीलवर्षी सहा ऑगस्ट रोजी घेण्यात आला होता. मागीलवर्षी सप्टेंबर पासून ते यावर्षी जून पर्यंत देशातील वेगवेगळ्या ठिकाणी याच्या चाचण्या झाल्या. सुमारे सव्वा कोटी रुपयांचे व्यवहार याद्वारे करण्यात आले. त्यासाठी डेबिट-क्रेडिट कार्डे तसेच मोबाईल वॉलेट वापरण्यात आले. ही पद्धती देशभर लागू करता येईल, असे त्यातून दिसून आले. त्यामुळे आता ही यंत्रणा देशभर लागू करण्यात येत असून याची सविस्तर कार्यप्रणाली लौकरच जारी केली जाईल. यामुळे डिजिटल पेमेंट पद्धती वाढीस लागेल अशी अपेक्षा आहे.

loading image
go to top