जुन्या चाळींच्या घरात शौचालय बांधण्यासाठी महापालिकेचा 'हा' प्लॅन

BMC
BMCsakal media

मुंबई : जुन्या चाळींमधील (old chaul) घरात शौचालय बांधण्याची (toilet permission) परवानगी देण्याबाबत महानगरपालिका (BMC strategy) धोरण आखणार आहे. महानगर पालिकेच्या विकास (development plan) नियोजन विभाग आणि इमारत प्रस्ताव विभागाच्या विशेष कक्षाला याबाबत प्रशासनाकडून(bmc orders) निर्देश देण्यात आले आहेत. (old chaul-toilet permission-BMC strategy-development plan-bmc orders-nss91)

मुंबईतील विशेष:त दक्षिण मुंबईतील जुन्या चाळींमध्ये प्रत्येक मजल्यावर सर्व घरांसाठी मिळून सार्वजनिक शौचालय आहे.जेष्ट नागरीकांना या शौचालयात जाण्यास अनंत अडचणींचा सामना करावा लागतो.त्याच बरोबर कोविड सारख्या परीस्थीतीत सार्वजनिक शौचालय धोकादायक ठरु शकते.त्यामुळे भाजपच्या रिटा मकवाना यांनी मजल्यावर सार्वजनिक शौचालय असलेल्या इमारतींच्या संचरात्मक परीक्षण करुन त्यामध्ये भित्तीधारीत (वॉलमाऊंटींग)शौचालय घरात बसविण्याची परवानगी द्यावी अशी ठरावाची सुचना मांडली होती.महापालिका सभागृहाने हा ठराव मार्च 2021 मध्ये मंजूर केला होता.

या ठरावावर प्रशासनाने महासभेच्या पटलावर अहवाल मांडला आहे.मकवाना यांच्या सुचनेनुसार याबाबत सर्वसमावेशक धोरण ठरविण्यासाठी महापालिकेतील विकास नियोजन विभाग आणि इमारत प्रस्ताव विभागाला अवगत करण्यात आले आहे.असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

BMC
गर्भाशयातच आला कवटीतून मेंदू बाहेर! वाडीयात यशस्वी शस्त्रक्रिया

सरकारकडून अनुदान

-स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत झोपडपट्टीतील रहिवाशांना घरात शौचालय बांधायचे असल्यास अनुदान मिळते.त्यासाठी केंद्र सरकारने मार्गदर्शक तत्वे आखून दिली आहेत.मात्र,यात भित्तीवर आधारीत शौचालयांचा समावेश नाही.मात्र,तरीही पालिका प्रशासनाने राज्य सरकारच्या नगरविकास विभागाकडे अनुदानाबाबत विचारणा केली आहे.

म्हणून स्ट्रक्‍चरल ऑडीट

सार्वजनिक शौचालय असलेल्या चाळी इमारती 70 वर्षाहून जुन्या आहेत.अशा इमारती,चाळीच्या संरचनेत बदल अथवा भार द्यायचा असल्यास भिंतीला धक्का पोहचू शकतो.त्यामुळे संरचनात्मक परीक्षण महत्वाचे आहे. महानगर पालिकेच्या नियमानुसार 30 वर्षापेक्षा जुन्या सर्व इमारतींचे संरचनात्मक परीक्षण करणे बंधनकारक आहे.त्यामुळे पालिकेचे धोरण ठरल्यानंतर सुरक्षीत असलेल्या चाळी,इमारतींमधील घरांमध्ये शौचालय बांधणे शक्‍य होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com