पुरातन मूर्ती तस्करीतील बड्या तस्कराला अटक

- अनिश पाटील
सोमवार, 6 मार्च 2017

मुंबई - देव-देवतांच्या पुरातन मूर्तींची तस्करी करणाऱ्या बड्या तस्करांपैकी एक उदीत जैन याला महसूल गुप्तवार्ता संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी (ता.3) चेन्नईत अटक केली.

मंदिरातील देवी-देवतांच्या पुरातन मूर्ती चोरून उदीत जैन त्या अमेरिकेतील व्यावसायिक विजय नंदाला पुरवत असल्याचे महसूल गुप्तवार्ता संचालनालयाच्या (डीआरआय) तपासातून निष्पन्न झाले आहे.

पहिल्या शतकातील टेराकोटाच्या मूर्ती, 17 व्या-18 व्या शतकातील महिषासूरमर्दिनीच्या मूर्ती, गणेशाच्या कांस्यमूर्ती, तसेच 10-11 व्या शतकातील दक्षिण भारताच्या मंदिरातून उखडून आणलेल्या वरद गणेश, पद्मपाणी, अवलोकितेश्वर, उभा विष्णू, नाग-नागीण आदी शिल्पांच्या तस्करीप्रकरणी विजय नंदाला यापूर्वीच डीआरआयच्या चेन्नई विभागाने अटक केली आहे. ई-मेलच्या छाननीत जैनचे नंदाशी असलेले व्यावसायिक संबंध उघडकीस आले होते.

स्थानिक गुंडांना हाताशी धरून दक्षिणेतील, तसेच पूर्व भारतातील मंदिरांमधून प्राचीन शिल्पे चोरली जातात. त्यांची बनावट कागदपत्रे तयार करून पुरातत्त्व विभागाचे प्रमाणपत्र घेतले जाते. त्यानंतर फर्निचर किंवा तयार कपड्यांच्या निर्यातीच्या साठ्यामध्ये मूर्ती दडवून त्यांची भारताबाहेर तस्करी करण्यात जैनचा हातखंडा होता, अशी माहिती तपासातून उजेडात आली आहे.

जैनला शिल्पकलेचे चांगले ज्ञान आहे. अनेक बनावट मूर्ती बनवण्यातही त्याचा हातखंडा असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, या चौकडीने अमेरिकेहून हॉंगकॉंगलाही 13 मूर्तींचे एक कुरियर जहाजाने पाठवले आहे. ते मिळवण्याचे डीआरआयचे प्रयत्न आहेत. त्याही मूर्ती लवकरच भारतात परत येतील, अशी आशा सूत्रांनी व्यक्त केली.

Web Title: old idol big smuggler arrested