वृद्ध कलावंतांना थकीत मानधन मिळणार...'याच' आठवड्यात कार्यवाही! सांस्कृतिक कार्य राज्यमंत्र्यांची माहिती

विनोद राऊत - सकाळ वृत्तसेवा
Friday, 17 July 2020

: कोरोना पार्श्वभूमीवर राज्यातील वृद्ध कलावंतांचे थकित मानधन देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

मुंबई : कोरोना पार्श्वभूमीवर राज्यातील वृद्ध कलावंतांचे थकित मानधन देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पहिल्या टप्प्यातील दोन महिन्यांचे थकीत मानधन येत्या आठवड्यात कलावंतांच्या खात्यात जमा होणार आहे. सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी ही माहिती दिली आहे.

लॉकडाऊनमुळे त्यांच्यावर कर्ज घेण्याची वेळ; पण कशासाठी? वाचून तुम्हालाही धक्का बसेल...

राज्यात कोव्हिडमुळे उद्भवलेल्या संकटात कलावंताच्या थकीत मानधनाचा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच, सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्याकडे पाठपुरावा केला. अखेर वित्त विभागाकडून वृद्ध कलावंतांचे थकित मानधन देण्याचा निर्णय घेतल्याचे सांस्कृतिक कार्य राज्यमंत्र्यांनी सांगितले.  या निर्णयामुळे राज्यातील जवळपास 28,800 कलावंतांना दिलासा मिळणार आहे. याबाबत कलावंत संघटनेचे पदाधिकारी व अनेक वृद्ध कलावंतांनी सरकारचे आभार मानले आहेत.
.....

स्वतःच्या कलेने लोकांचे मनोरंजन आणि सामाजिक प्रबोबधन करणाऱ्या कलावंतांना वृद्धापकाळात कलेचे सादरीकरण शक्य होत नाही. कलावंत हा समाजाचा एक महत्वाचा घटक आहे. त्यांच्या कल्याणासाठी व त्यांना मदत करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.
- राजेंद्र यड्रावकर, राज्यमंत्री सांस्कृतिक कार्य


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Older artists will get honorarium in a week's time! Information of the Minister of State for Cultural Affairs