मुंबई : थर्टी फर्स्ट पार्ट्यांवर निर्बंध; जाणून घ्या सविस्तर माहिती

ख्रिस्त जन्माच्या प्रार्थनेलाही नियम लागू
Thirty first parties
Thirty first partiessakal media

मुंबई : थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांसह (Thirty first December parties) येत्या काळात होणाऱ्या लग्नसोहळ्यांसह इतर कार्यक्रमांवर निर्बंध आले आहेत. राज्य सरकारच्या (Maharashtra Government) नाेव्हेंबर महिन्यांच्या नियमात बदल करुन मुंबई महानगरपालिकेने (BMC) 200 पेक्षा जास्त व्यक्तींच्या उपस्थितीसाठी (More thane two hundred people attendance) प्रभागातील सहाय्यक आयुक्तांची परवानगी घेणे महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल (Iqbal Singh chahal) यांनी बंधनकारक केले आहे.त्याबाबतचे परीपत्रक प्रसिध्द (Circular) करण्यात आले आहे. हा नियम धार्मिक, राजकीय कार्यक्रमांसह सर्व कार्यक्रमांना लागू असेल. ख्रिस्त जन्मासाठी 24 डिसेंबरला रात्री चर्चमध्ये होणाऱ्या प्रार्थनेलाही या नियम लागू होणार आहे.

Thirty first parties
"तेलबिया, तेल, कडधान्यांना वायदे बाजार प्रतिबंध स्वागतार्ह"

ओमिक्राॅनचे रुग्ण वाढत असताना मुंबईतील नियमात आलेल्या शिथिलतेने सार्वजनिक कार्यक्रमाता नागरिकांची उपस्थिती वाढली होती. तेथे नियमांचे पालन होत नसल्याबद्द आयुक्त चहल यांनी यापूर्वी नाराजी व्यक्त केली हाेती. त्यांनतर सोमवारी कठोर भुमिका घेत थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर सुधारीत नियमावली जाहीर केली आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या नोव्हेंबर महिन्याच्या नियमानुसार 1 हजार पेक्षा जास्त व्यक्त कार्यक्रमाला उपस्थीत राहाणार असतील स्थानिक आपत्ती निवारण प्राधिकरणाची परवानगी घेणे बंधनकारक होते.

मात्र, आता कार्यक्रमाला 200 पेक्षा जास्त माणसं उपस्थीत राहाणार असतील स्थानिक प्रभागाच्या सहाय्यक आयुक्तांची परवानगी घ्यावी लागणार आहे. पूर्वी प्रमाणे बंधीस्त सभागृहात 50 टक्के आणि खुल्या जागेत 25 टक्के उपस्थीत कार्यक्रम घेणे बंधनकारक आहे. मात्र, या अटीत राहून उपस्थीतांची संख्या 200 वर जाणार असेल तर त्यासाठी विशेष परवानगी घ्यावी लागणार आहे.

महापालिकेचे भरारी पथक

महानगरपालिकेने प्रत्येक प्रभागात दोन भरारी पथके तयार केली आहेत. तसेच, वेळ पडल्यास या पथकांची संख्याही वाढविता येणार आहे. महापालिका आयुक्त चहल यांनी सर्व कार्यक्रमांवर चोख लक्ष ठेवण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहे. उपस्थीत व्यक्ती मास्क लावून असल्याचे तसेच सहा फुटाचे अंतर राखून वावरत असल्याची खात्री करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रभागाच्या सहाय्यक आयुक्तांवर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

पोलिसांच्या मदतीने कारवाई ?

नियम मोडून कारवाई होत असेल तर साथ नियंत्रण कायदा, तसेच इतर कायद्या अंंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. यासाठी पोलिसांचीही मदत घेतली जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com