esakal | मुंबई-पुणे एक्प्रेस वे वर नियमांची ऐशीतैशी, सर्रास लेन कटिंग
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai pune express way

मुंबई-पुणे एक्प्रेस वे वर नियमांची ऐशीतैशी, सर्रास लेन कटिंग

sakal_logo
By
प्रशांत कांबळे ः सकाळ वृत्तसेवा

मुंबई: पनवेल आणि पुणे आरटीओ कार्यालयाच्या (rto) अंतर्गत पुणे-मुंबई महामार्गावर (mumbai-puna express way) राबविण्यात आलेल्या सहा दिवसाच्या विशेष कारवाई मोहिमेत धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यामध्ये अवजड वाहनांकडून सर्रास लेनकटिंग (Lane cutting) आणि ओव्हरस्पीड (overspeed) केले जात असल्याचे निष्पन्न झाले आहे. ढेकू गांव लगत महामार्गावरील निश्चित केलेल्या ब्लॅक स्पॉटवर पुणे आणि पनवेल आरटीओ कार्यालयाच्या पथकाने संयुक्त विद्यमाने ही कारवाई केली आहे. (On mumbai-puna express way vehicles breaking the rules)

मुंबई-पुणे महामार्गावरील गंभीर अपघातांची दखल घेत, परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी सहा दिवसाची विशेष कारकाई मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते. ज्यामध्ये 5 जुलै रोजी या कारवाईला सुरुवात केली असून, 10 जूलै पर्यंत या सहा दिवसात एकूण 760 वाहनांवर कारवाई करण्यात आली, ज्यामध्ये तब्बल 533 प्रकरण फक्त महामार्गावरील लेन कटिंगचे असल्याचे उघड झाले तर 114 प्रकरण ओव्हरस्पीडसाठी कारवाई करण्यात आली.

हेही वाचा: कोरोनाकाळात मुंबईकरांसाठी दिलासा! 'नॉन-कोविड' रुग्ण वाढले

त्याबरोबरच ओव्हरलोड 44, हेल्मेट 7, सीटबेल्ट 8, टॅक्स 6 , नो एन्ट्री 3 , बस 16, रिफ्लेक्टर 27, फिटनेस 13, पियुसी 14, हॉर्न 23, ओडिसी वाहन 26, ब्लॅक फिल्म 4, अशा विविध प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये एकूण 760 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यामधून 23 लाख 71 हजाराचा महसूल गोळा करण्यात आल्याचे परिवहन आयुक्त कार्यालयाने माहिती दिली आहे.

loading image