पालघरमधील बोर्डी झाई परिसरात भूकंपाचे एकापाठोपाठ एक दोन तीव्र धक्के

सकाळ वृत्तसेवा 
Saturday, 5 September 2020

- बोर्डी झाई परिसरात शुक्रवार (ता.4) मध्यरात्री एकापाठोपाठ एक दोन भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

बोर्डी - बोर्डी झाई परिसरात शुक्रवार (ता.4) मध्यरात्री एकापाठोपाठ एक दोन भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. पहिला भूकंपाचा धक्का  अकरा वाजून 42 सेकंदच्या दरम्यान बसला.

अठ्ठावीस मिनिटाच्या अंतराने बारा वाजून पाच मिनिटांनी भूकंपाचा दुसरा मोठा धक्का बसला. या धक्क्याची तीव्रता जबरदस्त असल्यामुळे मध्यरात्री त्यावेळी देखील लोक भयभीत होऊन जागे झाले. आणि घराबाहेर आले. सिल्वासा, दमण, उंबरगाव, वापी येथेही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. जाई येथील संदीप ठाकूर बोर्डी येथील जागृती पाटील संध्या म्हात्रे यांनीदेखील या घटनेला दुजोरा दिला आहे. 

(last update 12:25 am बातमी अपडेट होते आहे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One after another two strong Earthquake in Bordi Zai area of ​​Palghar

Tags
टॉपिकस
Topic Tags: