ठाण्यात वाहतूक पोलिसाच्या कानशिलात लगावली; ठगाला पोलिसांनी केली अटक

शर्मिला वाळुंज
Saturday, 12 December 2020

वाहतूकीचे नियम मोडणाऱ्या दुचाकीस्वाराचा ई चलान द्वारे कारवाई करण्याकरीता वाहतूक पोलिसाने फोटो काढला. याचा राग आल्याने दुचाकीस्वाराने वाहतूक पोलिसाच्या कानशिलात लगावल्याची घटना डोंबिवलीत शुक्रवारी दुपारी घडली

ठाणे - वाहतूकीचे नियम मोडणाऱ्या दुचाकीस्वाराचा ई चलान द्वारे कारवाई करण्याकरीता वाहतूक पोलिसाने फोटो काढला. याचा राग आल्याने दुचाकीस्वाराने वाहतूक पोलिसाच्या कानशिलात लगावल्याची घटना डोंबिवलीत शुक्रवारी दुपारी घडली. याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून देवरत नाडार यास अटक करण्यात आली आहे. 

मुंबई परिसरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

डोंबिवली वाहतूक पोलिस हवालदार शंकर कडू हे शुक्रवारी दुपारी कर्तव्यावर होते. मंजुनाथ हायस्कूलजवळ ते कार्यरत असताना दुपारी 1 च्या सुमारास देवरत नाडार (वय 24) हा तरुण दुचाकीवरुन मशाल चौकाकडून पेंडसेनगरकडे चालला होता. दुचाकीस्वार नियम मोडीत विरुद्ध दिशेने आल्याने कडू यांनी त्यास थांबण्याचा इशारा दिला. परंतू तो भरधाव वेगाने निघून जात असल्याचे निदर्शनास येताच कडू यांनी ई चलान द्वारे कारवाई करण्याकरीता त्याच्या दुचाकीच्या नंबरचा फोटो काढला. याचा तरुणास राग आल्याने त्याने दुसऱ्याठिकाणी त्याची दुचाकी उभी करुन कडू यांना फोटो का काढला अशी विचारणा करीत शिविगाळ केली. तसेच त्यांच्या शर्टाची कॉलर पकडून त्यांना कानशिलातही लगावली. याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती रामनगर पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक सचिन सांडभोर यांनी दिली.

One arrested for attacking traffic police in thane

-------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One arrested for attacking traffic police in thane