सुशांतसिंह राजपूत प्रकरण! पुण्यातून एकाला चरससह अटक

अनिश पाटील
Saturday, 24 October 2020

सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी तपास करणाऱ्या केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) अभिनेता अर्जुन रामपालची प्रेयसी गॅब्रिल्लाच्या भावाला नुकतीच अटक केली होती

मुंबई ः सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी तपास करणाऱ्या केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) अभिनेता अर्जुन रामपालची प्रेयसी गॅब्रिल्लाच्या भावाला नुकतीच अटक केली होती. त्याला ड्रग्स पुरवणाऱ्याला अटक करण्यात एनसीबीला यश आले आहे. साहिल मझार अली (वय 34) असे अटक आरोपीचे नाव असून, तो वांद्रे पश्‍चिम येथील रिक्‍लेमेशन परिसरातील रहिवासी आहे. 

राज्यातील ऑनलाईन परीक्षांवर सायबर हल्ल्याचा संशय; चौकशीसाठी समिती स्थापन

आरोपी टॅक्‍सी चालक असून, सध्या पुण्यातील दापोडी परिसरातील जयभीमनगर येथे वास्तव्याला होता. एनसीबीने त्याच्या घरावर छापा टाकला असता तेथे 7.2 ग्रॅम चरस सापडले. त्यानंतर त्याला ताब्यात घेतले असता, त्याने अभिनेत अर्जुन रामपाल याच्या प्रेयसीचा भाऊ आरोपीने ऍजिसिलाऊस डेमेट्रीऍडेट्‌स याला ड्रग्स पुरवल्याचे मान्य केले आहे. डेमेट्रीऍडेट्‌सला नुकतीच एनसीबीने अटक केली होती. लोणावळा येथे डेमेट्रीऍडेट्‌स राहत असलेल्या घरावर छापा टाकला. तेथे तो त्याच्या प्रेयसीसोबत राहत होता. त्याच्याकडून 0.8 ग्रॅम चरस जप्त केले आहे. त्यानंतर शनिवारी आरोपीच्या खार येथील घराचीही झडती घेण्यात आली. तेथे अलफ्रॅझोलन गोळ्यांची एक स्ट्रीप सापडली. आरोपीला तेथील एक रिक्षाचालक अमली पदार्थ पुरवत होता. तो साहिल अलीच होता. डेमेट्रीऍडेट्‌स त्याशिवाय याप्रकरणी अटक अनुज केशवानी व ड्‌वेन यांच्याही संपर्कात असल्याचा संशय आहे. याशिवाय डेमेट्रीऍडेट्‌स या प्रकरणातील आरोपी कैझानलाही ओळखत होता. त्याने डेमेट्रीऍडेट्‌स हशीश व आईसचा पुरवठा केला होता. 

मुंबईतून हिरेदागिने निर्यातीत वाढ; अमेरिका युरोपात भारतीय हिरे उद्योगाची आगेकूच कायम

डेमेट्रीऍडेट्‌सचा फोटो आरोपीला दाखवला असता त्याने आरोपीला पेडलर म्हणून ओळखले आहे. त्यामुळे डेमेट्रीऍडेट्‌स हा ड्रग्स वितरणाशी संबंधित असल्याचा संशय एनसीबीला आहे. आरोपी अलीने यापूर्वी एलएसटी व एमडीएमएही खरेदी केले असून, अनेक ड्रग्स पेडलरला तो ओळखतो. हे सर्व पेडलर एकमेकांशी संबंधित आहेत.

-----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One arrested from Pune Accused of supplying chemical to Gabriellas brother