esakal | आरा रा रा ! एका दिवसात झाली 'इतके' लाख लिटर दारूची विक्री, आकडा बघून तुमचेही डोळे फिरतील...
sakal

बोलून बातमी शोधा

आरा रा रा ! एका दिवसात झाली 'इतके' लाख लिटर दारूची विक्री, आकडा बघून तुमचेही डोळे फिरतील...

२३ मार्चपासून संपूर्ण देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. ३ मे ते १७ मे हा लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सध्या सुरु आहे. 

आरा रा रा ! एका दिवसात झाली 'इतके' लाख लिटर दारूची विक्री, आकडा बघून तुमचेही डोळे फिरतील...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : २३ मार्चपासून संपूर्ण देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. ३ मे ते १७ मे हा लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सध्या सुरु आहे. मात्र या तिसऱ्या टप्प्यामध्ये देशाची आर्थिक बाजू सावरण्यासाठी लॉकडाऊनचे काही नियम शिथिल करण्यात आले आहेत. दारूच्या दुकानांनाही यात परवानगी मिळाली आहे. राज्यात कंटेनमेंट झोन वगळता दारूची दुकान सुरु झालीत. त्यामुळे वाईन शॉप्सवर तळीरामांची चांगलीच गर्दी बघायला मिळाली होती. मात्र कालच्या एका दिवसात किती लिटर दारूची विक्री झाली हे वाचून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.

 ग्रीन, ऑरेंज आणि रेड अशा झोननुसार दारूची दुकानं उघडी ठेवण्याचा निर्यात घेण्यात आला होता. सोशल डिस्टंसिंगच्या  नियमांचं पालन करत दारूची दुकानं उघडण्यात आली होती. तब्बल दीड महिन्यानंतर दारूची दुकानं उघडल्यामुळे सर्वच दुकानांवर तळीरामांची चांगलीच गर्दी झाली होती. कालच्या एका दिवसात राज्यभरात तब्बल ३ ते ४ लाख लिटर दारूची विक्रमी विक्री झाली आहे. यातून तब्बल  १० ते ११ कोटींचा महसूल राज्य सरकारला मिळाला आहे.

लॉकडाऊनमुळे राज्याची आर्थिक परिस्थिती ढासळत चालली होती. मात्र आता दारूची दुकानं सुरू केल्यामुळे राज्याला काही प्रमाणात उत्पन्न मिळणार आहे. राज्याला सर्वाधिक उत्पन्न मिळवून देण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाचा तिसरा नंबर आहे. राज्याला सर्वात जास्त महसूल मिळवून देणाऱ्या विभागांमध्ये पहिल्या नंबरवर जीएसटी विभाग आहे. जीएसटी विभागाच्या माध्यमातून १ लाख कोटी आणि व्हॅटच्या माध्यमातून ३० हजार कोटी उत्पन्न राज्याला मिळते. तर दुसऱ्या नंबरवर स्टॅम ड्युटी विभागातून २७ हजार ५०० कोटी राज्याला उत्पन्न मिळते. तर दारूच्या विक्रीतून राज्याला दरवर्षी २७ हजार कोटी इतकं उत्पन्न प्राप्त होतं.

कालपासून मुंबई शहरात ३५० दारूची दुकानं,ठाणे जिल्ह्यात ९९२ तर मुंबई उपनगरात ७६९ दारूची दुकानं सुरु करण्यात आली आहेत.  राज्याच्या इतर शहरांमध्येही दारूची दुकानं सुरू करण्यात आली आहेत.

in one day maharashtra sold liquor that is around 10 to 11 liters read full story

loading image