अंबाडीत वीज पडून एक ठार, तीन जखमी

 दीपक हिरे
रविवार, 21 जुलै 2019

वज्रेश्वरी : भिवंडी तालुक्यातील अंबाडी ग्रामपंचायत हद्दीतील उंबरपाडा येथे सायंकाळी झालेल्या जोरदार वादळी पावसामुळे वीज पडून एक जण जागीच ठार झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

वज्रेश्वरी : भिवंडी तालुक्यातील अंबाडी ग्रामपंचायत हद्दीतील उंबरपाडा येथे सायंकाळी झालेल्या जोरदार वादळी पावसामुळे वीज पडून एक जण जागीच ठार झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

कित्येक दिवस गायब झालेल्या पावसाने शनिवारी सायंकाळी जोरदार वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात सुरुवात केली. अंबाडी जवळील उंबरपाडा येथे मंगल्या वाघे (वय 58),त्यांची पत्नी अलका वाघे (वय 50),त्यांची मुलगी प्रमिला वाघे (वय 20) आणि नातू विजय (वय 4) राहतात.

मजुरकाम करणारे येथील नदीकिनारी शेतीच्या कामासाठी गेले होते. काम संपवून घरी येण्यासाठी निघाले असता जोरदार वीज त्यांच्या अंगावर पडली. अलका वाघे हिचा जागीच मृत्यू झाला तर, मंगल्या वाघे त्याची पत्नी अलका वाघे आणि चार वर्षाचा नातू हे गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ अंबाडी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच येथील तलाठी तुगावे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 
   

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One died and three injured in ambadi

टॅग्स