आंदोलनाचा असाही फटका

दिपक घरत
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

पनवेल : मराठा आरक्षणाच्या मागणीकरता कळंबोली येथे करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान झालेल्या धावपळीत पाय घसरूण पडल्याने उस्मानाबाद येथील 75 वर्षीय शेतकऱ्याला कायम स्वरूपी अंपगत्व येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यांतील परांडा तालुक्यामधील धोत्री गावातील 75 वर्षीय दत्तु टिकुरे ह्या शेतकऱ्यांचा मुलगा कळंबोली येथे राहायला आहे. 

काही दिवसांपासुन दत्तु टिकुरे आपल्या मुलाकडे राहायला आले होते. 25 जुलै रोजी आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजातर्फे कळंबोली येथील शिव-पनवेल महामार्गावर करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान टिकुरे हे आपल्या घरी निघाले होते. आंदोलनामध्ये जमावाने दगडफेक सुरू केल्याने पोलिसांनी केलेल्या गोळीबाराने झालेल्या धावपळी झाली. यावेळी टिकुरे यांना एका आंदोलकाचा धक्का लागल्याने खाली पडलेल्या यांच्या कंबरेच्या हाडाला फटका लागला. लवकरात लवकर शस्त्रक्रीया न केल्यास कायमचे अपंगत्व येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. टिकुरेंवर सध्या कळंबोली येथील एमजिएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गोळी लागुन जख्मी
कळंबोली येथील आंदोलनादरम्यान गोळी लागुन जबर जख्मी झालेले दत्तु वाघमारे हे हि उस्मानाबाद जिल्ह्यातील असुन, त्यांच्यावरही कामोठे एमजीएम रुग्णालयातच उपचार सुरू आहेत. चालक असलेले वाघमारे तळेगावहुन मुंबईला कंटेनर घेउन निघाले होते. रास्ता रोको दरम्यान आदोलकांनी वाघमारेंची गाडी अडवल्याने ते आंदोलनाच्या धुमचक्रीत अडकले. दरम्यान कळंबोली येथे पोलिसांनी केलेल्या गोळीबाराची चौकशी करण्याची मागणी वाघमारेंच्या कुटुंबीयांनी उस्मानाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Web Title: one injured in maratha the agitation.