रायगड: 1 लाख 82 हजार बालकांना दिला जाणार पोलिओ डोस; आरोग्य यंत्रणा सज्ज

polio
poliosakal media

अलिबाग : रायगड (Raigad) जिल्ह्यात रविवारी (ता. २७) पल्स पोलिओ लसीकरण मोहीम (Polio vaccination drive) राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत पाच वर्षांपर्यंतच्या एक लाख ८२ हजार २८९ बालकांना दोन हजार ५२५ बुथवर पोलिओ डोस (Polio dose) देण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. मोहिमेत जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील एक लाख ८२ हजार २८९ बालकांना पोलिओ डोस (polio dose for children) देण्यात येणार आहे. त्यासाठी ग्रामीण भागात दोन हजार ३८२ आणि शहरी भागात १४३ असे एकूण दोन हजार ५२५ बुथवर लशीची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

polio
अभिनयाने नाही जमले, तरी मदतीने फुलवले चेहऱ्यावर हास्य!

याव्यतिरिक्त बस डेपो, रेल्वे स्थानक इत्यादी ठिकाणीसुद्धा लस देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या कार्यक्रमासाठी पाच हजार ६४७ आरोग्य कर्मचाऱ्यांची बुथवर नेमणूक करण्यात आलेली असून, अंगणवाडी सेविका, आशा, शिक्षक तसेच खासगी संस्थांचादेखील यामध्ये सहभाग घेण्यात आलेला आहे.

पाच वर्षांपर्यंतच्या बालकांना पोलिओसारख्या रोगापासून संरक्षण करण्यासाठी या लशीचा डोस देणे अत्यंत आवश्यक आहे. सर्व बालकांना या दिवशी पोलिओची लस पाजून कार्यक्रमात सहभागी व्हावे व सहकार्य करावे, असे आवाहनही डॉ. किरण पाटील व डॉ. सुधाकर मोरे यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com