मोबाईल पेमेंट करताना काळजी घ्या! लष्करी जवान असल्याचे सांगून लाखोंचा गंडा

अनिश पाटील
Saturday, 5 December 2020

लष्करी जवान असल्याचे सांगत खरेदी विक्रीच्या संकेतस्थळाद्वारे  गंडा घालणा-या एका ठगाला सायन पोलिसानी राजस्थान येथून अटक केली आहे

मुंबई -  आर्मीत जवान असल्याचे सांगत खरेदी विक्रीच्या संकेतस्थळाद्वारे व्यापा-याशी संपर्क करत, त्याला सेफ्टी ग्लासची ऑर्डर दिल्यानंतर बिल देण्यासाठी पेटीएम, गुगल पे, डेबीट कार्डच्या साह्याने गंडा घालणा-या एका ठगाला सायन पोलिसानी राजस्थान येथुन अटक केली आहे. या तोतया आर्मी जवानाने 99 हजार 997 रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले असुन, त्यानुसार, याचा अधिक तपास सुरु आहे.

हेही वाचा - धारावीकरांना कोरोनातून काहीसा दिलासा, केवळ एका रुग्णाची नोंद

हारून रहमत खान (29) असे अटक आरोपीचे नाव आहे. यातील तक्रारदार यांच व्यवसाय आहे. यावेळी संकेतस्थळाच्या सहाय्याने एका व्यक्तीने त्यांच्याशी संपर्क साधला. स्वतःची ओळख त्याने आर्मी जवान अशी करुन दिली. त्यानुसार, त्याने 4 हजार सेफ्टी ग्लासची ऑर्डर दिली. तर ग्लासचे पेमेंट करण्यासाठी त्याने फिर्यादी यांचा डेबीट कार्ड नंबर आणि ओटीपी क्रमांक मागुन घेतला. तसेच पेमेंट झाले नाही म्हणून त्यांनी पेटीएम, गुगल पे यांचे क्यू आर कोड स्कॅन केले. त्यानुसार, त्यांनी 99 हजार 997 रुपये काढले. पैसे काढल्याचा संदेश फिर्यादीला येताच, त्यांनी या आर्मी जवानाला फोन केला. मात्र त्याचा मोबाईल क्रमांक बंद असल्याचे समजले. यावेळी फसवणूक झाल्याचे समजताच, त्यांनी तत्काळ सायन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

हेही वाचा - कांजुरमार्गमधील मिठागराच्या जागेवर राज्य सरकारचा अधिकार नाही: केंद्र सरकार

 तपासादरम्यान या ठगाने फसवणूक केलेली रक्कम ज्या बँक खात्यावर वळवली त्या खाते क्रमांकाची सम्पूर्ण माहिती काढून खातेदार पाहिजे आरोपीच्या शोधकामी  एक पथक राजस्थान येथे पाठविले. या पथकाने राजस्थान येथे जाऊन दोन दिवस भरतपूर सायबर सेल यांच्या मदतीने तेथील जंगल परिसरात यातील ठगाचा शोध घेण्यास सुरुवात केली.  पाहिजे आरोपीचा त्यााच्य फोटोच्या आधारे राजस्थानाताल भरतपुर जिल्ह्यातील झोंझपुरी गावात या ठगाच्या मुसक्या आवळण्यात आल्या. तर याचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले

One lakh fraud by mobile payment in mumbai 

----------------------------------------------------------

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One lakh fraud by mobile payment in mumbai