
मुंबई : PMC बँक घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत या काल चैकशीसाठी उपस्थित राहिल्यात. मिसेस राऊत यांच्याआधी शिवसेनेचे नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांची तसेच त्यांच्या परिवाराची ED मार्फत 'टॉप्स ग्रुप' संबंधित चौकशी केली गेली. दरम्यान आता आणखी एक शिवसेनेचा नेता आणि त्यांचं कुटुंब ED च्या रडारवर आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय. हा प्रश्न उपस्थित होण्याचं कारण म्हणजे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज केलेलं एक ट्विट.
भारतीय जनता पक्ष नेते किरीट सोमय्या यांनी आज एक व्हिडीओ ट्विट केलाय. यामध्ये सोमय्या यांनी खळबळजनक भाष्य केलंय. व्हिडिओमध्ये किरीट सोमय्या म्हणतात की, "PMC HDIL प्रवीण राऊत घोटाळ्यात संजय राऊत यांच्या परिवाराची चौकशी सुरु आहे. अशाच वेळी या चौकशीतून आणखीन एक गोष्ट बाहेर आली. शिवसेनेचा असाच एक दुसरा खासदार राहिलेला नेता PMC बँक घोटाळ्याचा लाभार्थी आहे. त्यांची चौकशी व्हायला हवी", अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) January 5, 2021
दरम्यान, किरीट सोमय्या यांच्या आजच्या व्हिडीओमुळे आता PMC बँक घोटाळा प्रकरणात शिवसेनेच्या आणखी एका नेत्याचं नाव चर्चेत येणार का ? शिवसेनेच्या आणखी एका बड्या नेत्याची चौकशी होणार का ? हा नेता कोण आहे असे अनेक सवाल उपस्थित होतायत.
one one more ex mp of shivsena on the radar of ED bjp leader kirit somaiya targets shivsena
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.