राजकीय दबावामुळे डॉ. राहुल घुले यांनी खाल्ल्या ३० गोळ्या

ठाण्यातील प्रसिद्ध डॉक्टर राहुल घुले एक रुपया क्लिनिकचे संस्थापक
राजकीय दबावामुळे डॉ. राहुल घुले यांनी खाल्ल्या ३० गोळ्या

ठाणे: एक रुपयात क्लिनिक योजना सुरु करणारे डॉ. राहुल घुले (dr. Rahul Ghule) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांनी एकाचवेळी ३० गोळ्या घेतल्या. डॉ. राहुल घुले यांनी स्वत:च टि्वटरवरुन रुग्णालयात दाखल असल्याची माहिती दिली. आपण राजकीय दबावाखाली (political pressure) आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाही डॉ. घुले यांनी त्यांच्या जीवाला धोका असल्याचे म्हटले होते. "राजकीय दबावामुळे मी तणावात होतो. त्यातून मी ३० गोळ्या (tablets) खाल्ल्या. त्यामुळे मी हॉस्पिटलमध्ये आहे" असे डॉ. राहुल घुले यांनी सांगितले. त्यांनी हॉस्पिटल बेडवरुन फोटोही शेअर केला आहे. (One Rupee Clinics Rahul Ghule in hospital after consuming 30 tablets alleges political pressure) (सविस्तर वृत्त लवकरच)

डॉ. राहुल घुले यांनी आपले टि्वट आदित्य ठाकरेंना टॅग केले आहे. राजकीय एजंट आणि स्थानिक रिपोर्ट्समध्ये साखळी असून त्यांनी माझ्याकडून २९ लाख रुपये घेतले व 'आपला दवाखाना'मध्ये एक कोटींची गुंतवणूक करावी, यासाठी आग्रह करत होते, असा आरोप राहुल घुले यांनी केला आहे.

राजकीय दबावामुळे डॉ. राहुल घुले यांनी खाल्ल्या ३० गोळ्या
अधिवेशनाच्या मुद्द्यावरून 'मनसे'चा ठाकरे सरकारला सणसणीत टोला

"ठाणे महापालिकेने मागच्या सहा महिन्यापासून कुठल्याही बिलचे पेमेंट केलेले नाही. त्यामुळे कोणीही टोकाचे पाऊल उचलू शकतो, आत्महत्येचाही विचार करु शकतो" असे त्यांनी टि्वटरवर म्हटले आहे. "ठाण्याच्या सुप्रीमोना सर्व ठाऊक आहे. मला न्याय मिळालेला नाही. माझ छोटं कुटुंब आहे. त्यांना त्रास देऊ नका" असे डॉ. राहुल घुले यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे. रेल्वे प्रवासी आणि सर्वसामान्य नागरिकांना वैद्यकीय उपचार देण्यासाठी मध्य रेल्वेच्या वेगवेगळ्या स्थानकांवर एक रुपयात क्लिनिक योजना सुरु आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com