शाळाबाह्य बालकांसाठी "एक गाव, एक बालरक्षक' मोहीम; राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेची संकल्पना

तेजस वाघमारे
Saturday, 31 October 2020

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने संपूर्ण राज्यात "एक गाव, एक बालरक्षक' ही मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अनेक कुटुंबे स्थलांतरित होत आहेत. त्यामुळे 6 ते 14 वयोगटातील बालके शाळाबाह्य होत आहेत. यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने संपूर्ण राज्यात "एक गाव, एक बालरक्षक' ही मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शाळेतील प्रत्येक शिक्षकांवर शाळाबाह्य आणि अनियमित विद्यार्थ्यांना टिकविण्याची जबाबदारी द्यावी, अशा सूचना परिषदेने दिल्या आहेत. 

ज्येष्ठ अभिनेत्रीचा दावा दिशाभूल करणारा! वॉटर प्युरिफायरची जाहिरात मागे

बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षण अधिकार कायद्यानुसार, प्रत्येक बालकाला शिक्षणाचा हक्क प्राप्त झाला आहे. त्यानुसार 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक बालकांला शाळेच्या पटावर नोंदविले जाणे आणि त्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्याचा हक्क प्राप्त झाला आहे. शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून काही वर्षांपासून प्रयत्न करण्यात येत आहेत. यातच कोरोनाच्या कालावधीत नोकरी, व्यवसाय गेल्याने अनेक कुटुंबे स्थलांतरित होत आहेत. त्यामध्ये 6 ते 14 वयोगटातील बालकांचाही समावेश आहे. स्थलांतरामुळे अनेक बालके शाळाबाह्य होत आहेत. त्यांना शाळेत टिकवून ठेवण्यासाठी परिषदेने "एक गाव, एक बालरक्षक' ही मोहीम राबविण्याचे ठरवले आहे. त्यानुसार शाळा व्यवस्थापन समितीने शाळाबाह्य मुलांबाबत काम करण्याची तळमळ असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस बालरक्षक म्हणून नियुक्त करावे, प्रत्येक शाळेतील शिक्षकांवर शाळाबाह्य आणि अनियमित विद्यार्थ्यांना दाखल करून समन्वयाची जबाबदारी देण्याची सूचना केली आहे.

उर्मिला मातोंडकरांच्या उमेदवारीबद्दल वडेट्टीवरांचा मोठा गौप्सस्फोट; जाणून घ्या काय म्हणाले

याबाबत परिषदेने शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे. शाळा बंद असल्याने ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहचविण्यात यावे. त्याचप्रमाणे शाळाबाह्य बालकांचा वारंवार आढावा घ्यावा, अशा सूचनाही परिषदेने दिल्या आहेत. 

One Village One Child Guard Campaign for OutofSchool Children  

--------------------------------------------------

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One Village One Child Guard Campaign for OutofSchool Children