esakal | काय सांगता? ऑनलाईन वर्गच झाला हॅक; सायबर गुन्हेगारांचा ऑनलाईन शिक्षणावरही डोळा...
sakal

बोलून बातमी शोधा

online education hacked

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने ऑनलाइन वर्ग सुरू केले आहेत. मात्र वांद्रे येथील एका शाळेचे ऑनलाइन वर्गासाठी वापरत असलेले अॅपच हॅक झाल्याची बाब समोर आली आहे.

काय सांगता? ऑनलाईन वर्गच झाला हॅक; सायबर गुन्हेगारांचा ऑनलाईन शिक्षणावरही डोळा...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : राज्य सरकारने शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाइन शिक्षण सुरू केले. मात्र शाळांचे ऑनलाइन वर्ग हॅक होण्यास सुरुवात झाली असून विद्यार्थी सायबर गुन्हेगारीचे बळी ठरू लागले आहेत. यामुळे शाळांनी सायबर सुरक्षेबाबत शाळा सतर्क झाल्या आहेत.

आपुलकीचे उत्तम उदाहरण..! पाणीपुरी विक्रेत्याच्या कुटुंबियांसाठी मुंबईसह जगभरातून सरसावले मदतीचे शेकडो हात...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने ऑनलाइन वर्ग सुरू केले आहेत. मात्र वांद्रे येथील एका शाळेचे ऑनलाइन वर्गासाठी वापरत असलेले अॅपच हॅक झाल्याची बाब समोर आली आहे. असाच प्रकार अंधेरीतील एका शाळेत हॅकिंगचा वापर करून नववीच्या ऑनलाइन वर्गात दुसऱ्या इयत्तेचा विद्यार्थी सहभागी झाल्याचा प्रकार घडला. या विद्यार्थ्यांने वर्ग सुरू असताना असंसदीय कमेंट टाकण्यास सुरुवात केली. 

निर्णयाचा फेरविचार करा; उच्च न्यायालयाचा मिठीबाई महाविद्यालयाला आदेश...

यानंतर संबंधित शाळेने ऑनलाइन वर्ग थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता बहुतांश शाळांनी हजेरी घेण्यास सुरुवात केली आहे. यामुळे वर्गात नेमके कोण कोण आहेत हे शिक्षकांना समजू शकणार आहे. अनेक वर्गांना आदल्या दिवशी त्यांच्या वर्गाचा मिटींग आयडी आणि पासवर्ड येतो, असे असतानाही हा शिरकाव कसा होतो, याबाबत पालक चिंतेत आहेत.

मुंबई, पुण्यातील गर्दी नियंत्रणासाठी गडकरी यांनी सुचवलाय 'हा' पर्याय!

तर विद्यार्थी सायबर गुन्हेगारीचे बळी होण्याची भीतीही व्यक्त होत आहे. दरम्यान, अनेक शाळांनी आवश्यक त्या सुरक्षा उपाययोजना अवलंबण्यास सुरुवात केली आहे.

loading image