loan application fraud greed nbfc digital era crime cyber marathi news
loan application fraud greed nbfc digital era crime cyber marathi newssakal

Panvel Crime: पनवेलमध्ये महिलेला लाखोंचा ऑनलाईन गंडा, ६ नायजेरियन गुन्हेगारांना दिल्लीतून अटक

पनवेल, ता. २५ (बातमीदार) ः अत्यंत गुंतागुंतीच्या सायबर गुन्ह्याची शिताफीने आणि धाडसाने उकल करत सहा नायजेरियन सायबर गुन्हेगारांना पनवेल पोलिसांनी दिल्लीतून जेरबंद केले. सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख करत पनवेलमधील एका महिलेची तब्बल ३ लाख २५ हजार ५०० रुपयांची एका महिन्यापूर्वी फसवणूक झाली होती. पोलिसांचे या कामगिरीबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी अभिनंदन केले आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिस तपास यंत्रणा कार्यान्वित केली. ऑनलाईन सायबर गुन्हा असल्याने त्या संदर्भात योग्य तपास दिशा मिळण्यासाठी सायबर तज्ज्ञांची मदत घेण्यात आली. सायबर गुन्हेगार तांत्रिकदृष्ट्या अनेक आधुनिक उपकरणांची मदत घेऊन लोकांची आर्थिक फसवणूक करत असतात. त्यामुळे सायबर गुन्हेगारांना जेरबंद करण्यासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली व्यूहरचना आखण्यात आली.

१८ पोलिस आणि सायबर तज्ज्ञ अशी टीम बनवण्यात आली. तपासाच्या अनुषंगाने गुन्हेगारांचे केंद्र दिल्लीजवळ असल्याचे या टीमच्या निदर्शनास आले. त्यानुसार गुन्हेगारांना पकडण्यासाठी पनवेलहून ही टीम दिल्लीला रवाना झाली. त्यांनी तब्बल दहा दिवस दिल्लीमध्ये शोध मोहीम घेऊन सहा आरोपींना अटक केली. हे सर्व आरोपी नायजेरियन आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com