

Navi Mumbai Fraud
ESakal
नवी मुंबई : विवाहासाठी योग्य जोडीदार ऑनलाइन शोधणे एका तरुणीला चांगलेच महागात पडले आहे. उरणमधील एका ३० वर्षीय तरुणीला विवाह संकेतस्थळावरुन संपर्क साधून सायबर भामट्यांनी तब्बल पाच लाख ५२ हजारांचा गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी उरण पोलिसांनी गुन्हा दाखल केला.