लोकल सुरू करण्याबाबत सर्वात मोठं सर्वेक्षण; वाचा काय म्हणताय मुंबईकर...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 29 May 2020

  • कोरोनाच्या संकटामुळे मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल सेवा थांबली आहे. लोकल सुरू झाली, तरी सोशल डिस्टन्सिंग असल्यामुळे मुंबईकर प्रवासासाठी धाव घेतील का, हा मोठा प्रश्न आहे.
  • मुंबईकरांचा मूड जाणून घेण्यासाठी नुकताच ऑनलाईन सर्व्हे करण्यात आला. त्यानुसार तब्बल 61 टक्के मुंबईकरांनी तीन महिने तरी लोकल प्रवास टाळायचा आहे, असे सांगितले.

मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल सेवा थांबली आहे. लोकल सुरू झाली, तरी सोशल डिस्टन्सिंग असल्यामुळे मुंबईकर प्रवासासाठी धाव घेतील का, हा मोठा प्रश्न आहे. मुंबईकरांचा मूड जाणून घेण्यासाठी नुकताच ऑनलाईन सर्व्हे करण्यात आला. त्यानुसार तब्बल 61 टक्के मुंबईकरांनी तीन महिने तरी लोकल प्रवास टाळायचा आहे, असे सांगितले.

ही बातमी वाचली का? पावसाळ्यापूर्वी रग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय

एम इंडिकेटर ॲपचे जनक सचिन टेके यांनी हे ऑनलाईन सर्वेक्षण केले. त्यात तब्बल 50,954 नागरिकांचे मत आजमावण्यात आले. त्यापैकी 61 टक्के मुंबईकरांनी एक महिना ते तीन महिने लोकल पकडायची नाही, असे सांगितले. बाकीच्या 39 टक्के नागरिकांना मात्र लगेच लोकल प्रवास सुरू करायचा आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर लोकल सेवेबद्दल मुंबईकरांची मते मूड जाणून घेण्याचा उद्देशाने हे सर्वेक्षण करण्यात आल्याचे सचिन टेके म्हणाले. नवी मुंबईत नेरूळ येथील रहिवासी असलेल्या टेके यांनी 2010 मध्ये सुरू केलेले एम इंडिकेटर ॲप अत्यंत लोकप्रिय झाले आहे.

ही बातमी वाचली का? तयारीला लागा! या दिवशी मुंबईत दाखल होणार पाऊस, हवामान खात्याचा अंदाज...

मेट्रो, बस सेवेला फटका बसण्याची शक्यता
लॉकडाऊनंतर सार्वजनिक प्रवासाची व्याख्या बदलणार असल्याचे टेरी (दी एनर्जी रिसोर्सेस इस्टिट्यूट) या संस्थेने केलेल्या अभ्यासात पुढे आले आहे. त्यामुळे बस, मेट्रो प्रवाशांची संख्येत  घट होऊ शकते. शेअर प्रवास टाळण्याकडे लोकांचा कल असेल. या काळात प्रवासी खासगी वाहने, टॅक्सी, रिक्षाचा पर्याय अधिक प्रमाणात स्वीकारतील. बदलत्या मानसिकतेमुळे मेट्रोचे नऊ टक्के, बसचे चार टक्के आणि लोकलचे एक टक्के प्रवासी कमी होऊ शकतात, असा इशारा टेरीने दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online surveys on starting local trains; Sixty-one per cent of mumbaikar say, don't miss the local for three months