
मुंबई : राज्यातील ३६ पैकी केवळ ७ जिल्ह्यांचेच राज्याच्या सकल राज्य उत्पन्नात (जीएसडीपी) ५४ टक्के योगदान असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. सर्वाधिक योगदान देणाऱ्या जिल्ह्यांमध्ये मुंबई शहरासह मुंबई उपनगर, पालघरसह ठाणे, पुणे, नागपूर, रायगड, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग यांचा समावेश आहे. संबंधित अहवाल हा सोळाव्या वित्त आयोगास सादर करण्यात आला आहे. या अहवालाच्या निमित्ताने प्रादेशिक अर्थकारणातील असमतोल उघड झाला आहे.