esakal | मुंबईत दिवसभरात फक्त १८ गर्भवती महिलांचे लसीकरण !
sakal

बोलून बातमी शोधा

Vaccination Pregnant woman

मुंबईत दिवसभरात फक्त १८ गर्भवती महिलांचे लसीकरण !

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : स्तनदा मातांच्या लसीकरणास (Pregnant woman) 19 मे 2021 पासून  सुरुवात करण्यात आली आहे. तर आजपासून  ‘राष्‍ट्रीय लसीकरण तांत्रिक सल्‍लागार गट’ व ‘कोविड - 19’ लसीकरणासाठी (Corona Vaccination) असलेला ‘राष्‍ट्रीय तज्ज्ञ गट’ यांच्‍या शिफारशीनुसार भारत सरकारने (Indian Government) गरोदर महिलांना ‘कोविड - 19’ लसीकरणात समाविष्‍ट केले आहे. यानुसार गुरुवारपासून बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रातील 35 लसीकरण केंद्रांवर (vaccination Center) गरोदर मातांचे लसीकरण सुरु झाले आहे. पहिल्या दिवशी दुपारी 2 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे लसीकरण झाले असून गर्भवतींचा या लसीकरणाला अल्प प्रतिसाद (less Participation) मिळाला आहे. पालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार,  तीन तासांत फक्त 18 गर्भवतींनी पुढाकार घेत लसीकरण घेतले. ( Only Eighteen Pregnant Woman get vaccinated in first day drive of BMCnss91)

हेही वाचा: सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी महापालिकेने घेतला 'हा' निर्णय

दरम्यान, आज दिवसभरात एकूण 66,421 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. तर, स्तनदा मातांच्या लसीकरणासही कमी प्रतिसाद मिळत असून आज दिवसभरात 26 मातांचे लसीकरण झाले तर आतापर्यंत एकूण 3646 एवढ्या मातांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. दरम्यान, पालिकेने वैश्या व्यवसाय करणाऱ्या महिला आणि तृतीयपंथासाठी विशेष लसीकरण घेतले.  ज्यात मिळून 28 जणांचे लसीकरण केले गेले..

loading image