दादरमध्ये दोन तर धारावीत केवळ एका नव्या कोरोना रुग्णाची नोंद 

मिलिंद तांबे
Monday, 16 November 2020

मुंबईतील जी उत्तर वॉर्डमध्ये आज 14 नविन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली.

मुंबई, ता. 16 : मुंबईतील जी उत्तर वॉर्डमध्ये आज 14 नविन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. तर एकेकाळी कोरोनाचा हॉटस्पॉट असणाऱ्या धारावीमध्ये आज दिवसभरात केवळ 1 नवीन रुग्ण आढळून आला असून एकूण धारावीतील एकूण रूग्णसंख्या 3,621 इतकी झाली आहे. तर धारावीत 14 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

महत्त्वाची बातमी : आता मुंबई मेट्रो तुम्हाला सांगेल पत्ता, MMRDA राबवणार भन्नाट आयडिया

तर दुरीकडे दादरमध्ये आज केवळ 2 नवीन रुग्ण सापडले असून असून रुग्णांची एकूण संख्या ही 4,448 इतकी झाली आहे. तर दादरमध्ये 110 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

माहीममध्येही आज केवळ 11 नवीन रुग्णांची भर पडली असून रुग्णांची संख्या 4,207 इतकी झाली आहे. तरमाहीमध्ये 250 ऍक्टिव्ह रूग्ण आहेत. 

महत्त्वाची बातमी :  मुंबईकरांची यंदाची दिवाळी शांततेत; गेल्या १५ वर्षांतील सर्वात कमी आवाजाची नोंद

धारावी, दादर, माहिम परिसराचा समावेश असणा-या  जी उत्तर विभागात आज एकूण 14 नविन रुग्णांची भर पडली असून रूग्णांचा एकूण आकडा 12,276 वर पोहोचला आहे. तर या वर्धीत 374 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

जी उत्तरमध्ये आतापर्यंत 622 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. धारावीमध्ये 3,296, दादरमध्ये 4,169 तर माहीम मध्ये 3,815 असे एकूण 11,280 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

only one corona patient in dharavi and two in dadar detected


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: only one corona patient in dharavi and two in dadar detected