आणखी किती संकटांना तोंड द्यायचं मुंबईकरांनी? 'या' गैरसोयीसाठीही राहावं लागणार तयार

सकाळ वृत्तसेवा 
शनिवार, 4 जुलै 2020

जुन महिना कोरडा गेल्यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 7.61 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

मुंबई: जुन महिना कोरडा गेल्यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 7.61 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. 2018 नंतरची हि सर्वात कमी पातळी आहे. सध्या धरणांमध्ये एक लाख 10 हजार 98 दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा आहे. आता केवळ महिन्या भराचा पाणीसाठा शिल्लक आहे.

चीनला इंगा दाखवल्यानंतर 'एमएमआरडीए'चे 'मेक इन इंडिया'ला प्राधान्य; मोनोरेलच्या कामासाठी 'या' कंपन्यांसोबत सुरु आहे चर्चा...

ठाणे जिल्ह्यातील मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या परीसरात जूनच्या दुसऱ्या पंधरावड्यात पाऊस जोर धरतो. यंदा जून महिना कोरडाच गेला आहे. मुंबईला वर्षभर पाणी पुरवठ्यासाठी 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर पाण्याची गरज असते. मात्र, यंदा अद्याप एक लाख 10 हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा आहे. तर 2018 मध्ये तीन लाख 10 हजार 934 दशलक्ष लिटर 21.48 टक्के, 2019 मध्ये 1 लाख 69 हजार 786 दशलक्ष लिटर  11.73 टक्के पाणीसाठा जमा होता.

यंदा गणेशोत्सव केला नाही तरी चालेल; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली महत्वाची माहिती...

अप्पर वैतरणा धरणात शून्य टक्के उपयुक्त पाणीसाठा जमा आहे. तर तानसा मध्ये 9 टक्के आणि शहराला सर्वाधिक पाणी पुरवठा करणाऱ्या भातसा धरणात 6.05 टक्के पाणीसाठा जमा आहे. मध्य वैतरणात 10.69 टक्के आणि मोडकसागर मध्ये 19 टक्के, विहार मध्ये 19.99 टक्के आणि तुसली मध्ये 29.52 टक्के पाणीसाठा जमा आहे.

भारतात तयार होणाऱ्या कोरोनावरील लसीबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणालेत की....

पाणीसाठा दशलक्ष लिटर मध्ये 
 

धरण  उपलब्ध पाणीसाठा एकूण पाणीसाठी 
अप्पर वैतरणा   00       2,27,047
मोडकसागर    24,609    1,28,925
तानसा  13,488      1,45,080
मध्य वैतरणा  20,681  1,93,530
भातसा         43,407       7,17,037
विहार     5,537      27,698
तुसली     2,375     8,046

only Seven percent of the water in the dams is enough for a month


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: only Seven percent of the water in the dams is enough for a month