मुलाच्या वजनाच्या दहा टक्केच! दप्तराचे ओझे केंद्राचे ‘स्कूल बॅग धोरण जाहीर

तेजस वाघमारे
Saturday, 28 November 2020

: केंद्रीय शिक्षण विभागाने स्कूल बॅग धोरण 2020 प्रसिद्ध केले आहे. या धोरणानुसार विद्यार्थ्याच्या वजनाच्या केवळ दहा टक्के दप्तराचे वजन ठेवण्याची सुचना केली आहे

मुंबई : केंद्रीय शिक्षण विभागाने स्कूल बॅग धोरण 2020 प्रसिद्ध केले आहे. या धोरणानुसार विद्यार्थ्याच्या वजनाच्या केवळ दहा टक्के दप्तराचे वजन ठेवण्याची सुचना केली आहे. तसेच पूर्व प्राथमिक वर्गांना दप्तरच नसणार आहे. 

हेही वाचा - राजभवनात हिंदूंनाही उपासनेसाठी जागा द्या! हिंदु जनजागृती समितीची मागणी

इयत्ता पहिली आणि दुसरीकरीता एक वही आणि तिसरी ते पाचवीसाठी एक वर्गातील आणि एक गृहपाठ अशा दोन वह्या तर सहावी ते आठवीकरीता फाइल सूटे कागद नोट्स काढण्यासाठी वापरण्या याव्यात असे या धोरणात सांगण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराच्या ओझ्यामुळे मुलांना पाठदुखीचा आजार जडला होता. याविरोधात देशभरातील पालकांनी तक्रारी केल्या होत्या. हे प्रकरण उच्च न्यायालयातही गेले. यानंतर 2018 मध्ये केंद्र सरकारने दप्तराचे आझे किती असावे याबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी एक समिती नियुक्त केली होती. या समितीच्या अहवालातील शिफासरशींना केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. त्यानुसार या धोरणाची अंमलबजावणी देशातील सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशामध्ये करण्याची सुचना केंद्र सरकारने दिल्या आहेत.

हेही वाचा - लवकरच मनोरंजन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा मिळणार; प्रस्ताव सादर करण्याचे सांस्कृतिक मंत्र्यांचे आदेश

तसेच शाळांचे वेळापत्रक कसे असावे याबाबतही यामध्ये सुचना करण्यात आल्या आहेत. या मसुदा तयार करण्यासाठी केलेल्या सर्वेक्षणात 352 शाळा, 2992 पालक आणि 3624 विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये 19 टक्के प्राथमिक शाळांच्या प्रमुखांनी विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन अधिक असल्याचे मान्य केले. तर रोज न्यावी लागणारी सर्व पाठ्यपुस्तके, वह्या, संदर्भ पुस्तके, क्रीडा आणि अन्य साहित्य, जेवणाचा डबा यामुळे वजन वाढत असल्याचे पालकांनी या सर्वेक्षणात स्पष्ट केले.

हेही वाचा - शिवाजी नाट्यमंदिराच्या भाड्यात सवलत मिळावी; मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाची मागणी

इयत्तेनिहाय  दप्तराचे वजन
इयत्ता    - विद्यार्थ्याचे वजन    - दप्तराचे वजन
पूर्व प्राथमिक    - 10 ते 16 किलो    -  दप्तराविना
पहिली, दुसरी -     16 ते 22 किलो    1.6 ते 2.2 किलो
तिसरी ते पाचवी    - 15 ते 25 किलो    1.5 ते 2.5 किलो
सहावी, सातवी    २० ते ३० किलो    २ ते ३ किलो
आठवी    - 25 ते 40 किलो    - 2.5 ते 4 किलो
नववी, दहावी -     25 ते 45  किलो    - 2.5 ते 4.5किलो
अकरावी, बारावी    ३५ ते ५० किलो    ३.५ ते ५ किलो

 

अशी होणार अमलबजावणी
- शिक्षकांनी नियमितपणे विद्यार्थ्यांचे दप्तर तपासावे लागणार आहे.
- दप्तराचे आझे वाटणार नाही याप्रमाणे वेळापत्रक आखावे लागणार.
- वर्गात पाठ्यपुस्तके शेअर करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी
-  पिण्याच्या पाण्याची सोय करावी
- पाठ्यपुस्तकांची निर्मिती करतानाही वजन वाढणार नाही याचा विचार व्हावा.

Only ten percent of the childs weight! Backpack burden center announces school bag policy

-------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Only ten percent of the childs weight Backpack burden center announces school bag policy