सिंहगडापासून शिवरायांचा जयघाेष

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 12 February 2020

कोंढाणा किल्ला जिंकण्यासाठी स्वतःच्या मुलाचा विवाह सोहळा बाजूला सारून तान्हाजी यांनी त्यावर स्वारी केली. त्याचा थरारक इतिहास नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘तान्हाजी’ चित्रपटातही अनेकांनी अनुभवला. कोंढाणा रणसंग्रामात तान्हाजी धारातीर्थी पडले. त्यानंतर त्यांचे पार्थिव सिंहगडावरून मढे घाटातून पालखीतून उमरठ येथे आणण्यात आले. त्याच मार्गाने शौर्य पालखी काढण्यात येणार आहे.

पोलादपूर : तान्हाजी मालुसरे यांच्या शौर्याची साक्ष देणाऱ्या सिंहगड ते उमरठ गावादरम्यान शनिवारी (ता.१५) तान्हाजी आणि शिवाजी महाराजांचा जयघोष होणार आहे. निमित्त आहे, तान्हाजी यांच्या ३५० व्या पुण्यतिथीचे. 

कोंढाणा किल्ला जिंकण्यासाठी स्वतःच्या मुलाचा विवाह सोहळा बाजूला सारून तान्हाजी यांनी त्यावर स्वारी केली. त्याचा थरारक इतिहास नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘तान्हाजी’ चित्रपटातही अनेकांनी अनुभवला. कोंढाणा रणसंग्रामात तान्हाजी धारातीर्थी पडले. त्यानंतर त्यांचे पार्थिव सिंहगडावरून मढे घाटातून पालखीतून उमरठ येथे आणण्यात आले. त्याच मार्गाने शौर्य पालखी काढण्यात येणार आहे. त्याची सुरुवात शनिवारी सकाळी ६ वाजता सिंहगडवरून होणार आहे. ही पालखी राजगड पायथा येथून विंजर गावात पोहोचेल. त्यानंतर केळद गावात पालखीचे स्वागत होईल. मढेघाट मार्गे महाडच्या बाजूला ती सायंकाळी येणार आहे. बिरवाडी परिसरात गावडी गावाजवळ मुक्काम होईल.

यामध्ये शिवप्रेमी संघटना आणि शिवभक्त सहभागी होणार आहेत. राजवाडी फाटा महामार्गाने पोलादपूर येथे कवींद्र परमानंद समाधिस्थळी दाखल होईल.
 पोलादपूमधून पालखी कापडे येथे रवाना होणार आहे.  कापडे येथून बोरज फाटा साखर सुभेदार सूर्याजी मालुसरेंचे स्मारक येथे आल्यानंतर उमरठपर्यंत दाखल होणार आहे.

धक्कादायक : पडे बदलण्याच्या खोलीत छुपा कॅमेरा

जय्यत तयारी 
ढोल पथक, खालू बाजाच्या गजरात हा पालखी सोहळा होणार आहे. या मध्ये वारकरी सहभागी होणार आहेत. शाळकरी विद्यार्थी, महिला मंडळ, लोकप्रतिनिधींचाही यात सहभाग असणार आहे. पालखी यात्रेचे आयोजन तान्हाजी मालुसरे उत्सव समिती चॅरिटेबल ट्रस्ट करत आहेत. अनिल मालुसरे, मैत्रेय प्रतिष्ठान, डॉ. आमर अडके, शिवमुद्रा प्रतिष्ठान आदी सहभागी होणार आहेत, अशी माहिती देण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Opportunity to experience history