Maharashtra Politics : पक्ष न सोडणारा विरोधी पक्षनेता हवा...

Congress Party Update : काँग्रेसकडून अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, थोरात यांची नावे आघाडीवर
Maharashtra Politics
Maharashtra Politicssakal

Mumbai News : महाराष्ट्रातील विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद सुमारे चार वर्षांनंतर काँग्रेसकडे चालून येते आहे. या पदासाठी कोणत्याही परिस्थितीत भाजपकडे न जाणाऱ्या नेत्याच्या शोधात पक्षश्रेष्ठी असून पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात हे तीन नेत्यांची नावे चर्चेत आहेत.

आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेले हे पद संख्याबळाच्या आधारावर आता काँग्रेसकडेच जाईल, असे अशी भूमिका राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज जाहीर केली आहे.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे संपूर्ण राज्यात फिरून सरकारविरोधात रान उठवत असतानाच त्यांना त्याच पदावर ठेवून पक्षावर अविचल निष्ठा असलेला नेता सोमवारी सकाळपर्यंत नेमला जाण्याची शक्यता आहे.

पटोले यांना यासंदर्भात चर्चा करण्यासाठी दिल्लीला बोलावून घेण्यात आले होते. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी त्यांची विस्तृत चर्चाही झाली, मात्र ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांना ताप आला असल्याने त्यांचे मत अद्याप समजलेले नाही, असे सूत्रांनी सांगितले.

ओबीसी मतपेटी नाना पटोलेंमुळे जवळ येऊ शकेल ही शक्यता गृहित धरत मराठा नेतृत्वाला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. अशोक चव्हाण हे मराठवाड्यावर पकड असलेले नेते आहेत. मुख्यमंत्री असताना त्यांनी कार्यकर्ते-आमदारांची मनेही राखली होती.

Maharashtra Politics
Maharashtra Politics : विरोधी पक्षनेतेपदावर पुण्यातील काँग्रेस आमदाराचा दावा; थेट पक्षाध्यक्षांना पाठवला बायोडेटा

मात्र, शिंदे सरकारवरील विश्वासप्रस्ताव मतदानावेळी ते उशिरा सभागृहात पोहोचल्याने त्यांच्याबद्दल अविश्वासाचे वातावरण तयार झाले होते. तरीही, त्यांनाच संधी मिळायला हवी असे काहींचे म्हणणे आहे.

पृथ्वीराज चव्हाण हे नियम, अभ्यास याबाबत अत्यंत योग्यप्रकारे मार्गदर्शन करतील; पण आमदार त्यांच्यावर मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत फारसे खूष नव्हते, हे कारणही दिले जाते आहे. शांत, संयत बाळासाहेब थोरात हे ही पक्षाला सांभाळून घेण्यात आघाडीवर असतात. राहुल गांधींशी त्यांचे उत्तम संबंध आहेत. पण ते आक्रमक विरोध करतील का याची शंका आहे.

Maharashtra Politics
Youth Politics : युवा नेते देताहेत राजकारणाला नवी दिशा...

तरुणांनाही संधी शक्य

विरोधी पक्षनेतेपदासाठी तरुणाला संधी देण्याचा निर्णय झाला तर पूर्वी हे पद सांभाळलेले विजय वडेट्टीवार, डॉ.नितीन राऊत, सुनील केदार, यशोमती ठाकूर यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो. हे तिघेही विदर्भातील असल्याने त्यांची नावे पुढे केली जातील काय याबाबत शंका आहे. कुणाल पाटील, संग्राम थोपटे, विश्वजित कदम ही नावेही आज चर्चेत होती. काँग्रेसकडून कोणाला संधी मिळणार ते सोमवारीच कळू शकेल, असे सांगितले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com