
मुंबई : राज्यविधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात आज शेवटच्या दिवशी सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना चिमटे काढत त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांची चांगलीच फिरकी घेतली. विरोधी बाकांवरील संख्या चिंताजनक असून असे व्हायला नको होते असा टोला शिंदे यांनी लगावला तर तुमचा करेक्ट कार्यक्रम झाला हे मान्य करा असा टोमणा अजित पवार यांनी मारला.