esakal | Mumbai Rains : मुंबईकरांनो सावधान! मुसळधार पावसामुळे ऑरेंज अलर्ट जाहीर
sakal

बोलून बातमी शोधा

orange alert declares in Mumbai by IMD

दरम्यान, या मुसळधार पावसामुळे काही रस्त्यांवर पाणी साचल्याने बेस्ट बसेसचे मार्ग बदलण्यात आले आहेत. तर काही रेल्वे स्थानकांवर रूळावर पाणी साचण्यास सुरवात झाली आहे.

Mumbai Rains : मुंबईकरांनो सावधान! मुसळधार पावसामुळे ऑरेंज अलर्ट जाहीर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईसह, नवी मुंबई व उपनगरांमध्ये पावसाने जोरदार आगमन केलंय. गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने कालपासून (ता. 3) पुन्हा जोर धरलाय. मुंबईत हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे.

मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, मीरारोड, पालघर या भागात पाऊस बरसला. त्यामुळे माटुंगा, दादर, हिंदमाता, करीरोड, सायन, चिंचपोकळी, अंधेरी, विलेपार्ले या भागांत मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली.

दरम्यान, या मुसळधार पावसामुळे काही रस्त्यांवर पाणी साचल्याने बेस्ट बसेसचे मार्ग बदलण्यात आले आहेत. तर काही रेल्वे स्थानकांवर रूळावर पाणी साचण्यास सुरवात झाली आहे.

काल (ता. 3) मुंबईतील समुद्र किनाऱ्यांवर भरतीमुळे हाय अलर्ट जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे दीड दिवसांचे गणपती समुद्रात विसर्जन करण्यासाठी मुंबई महापालिकेने बंदी केली होती. 

loading image
go to top