मुंबईत ऑरेंन्ज अलर्टचा इशारा! दोन दिवसात मुसळधार पावसाचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत ऑरेंन्ज अलर्टचा इशारा! दोन दिवसात मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि परिसरात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

मुंबईत ऑरेंन्ज अलर्टचा इशारा! दोन दिवसात मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई- काही दिवसांपासून दडी मारुन बसलेला पाऊस मुंबईत काही ठिकाणी पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. एका आठवड्याच्या ब्रेकनंतर या आठवड्याच्या शेवटी पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे. जूनमध्ये मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला. मुंबईत पावसानं हजेरी लावली, मात्र एका आठवड्यांपासून पावसानं दडी मारली आहे. अशातच मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि परिसरात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. 

Big News - अकरावी प्रवेशाची नोंदणी 15 जुलैपासून, जाणून घ्या नोंदणीसाठीचं वेळापत्रक 
 

मुंबई, ठाणे आणि पालघर येथे 5 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस होण्याचा इशारा भारतीय हवामान खात्यानं दिला आहे. त्यासोबतच शुक्रवारी आणि शनिवारी मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज असून मुंबईतला ऑरेंन्ज अलर्ट देखील देण्यात आला आहे. भारत हवामान खात्याने (आयएमडी) जारी केलेल्या जिल्हा अंदाज आणि इशाऱ्यानुसार, गुरुवारी मुंबईत अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पुढील पाच दिवस पश्चिम आणि मध्य भारतात तीव्र पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. चक्रीय वाऱ्यांचे एक क्षेत्र दक्षिण गुजरात आणि त्या जवळील भागात तर दुसरे पूर्व उत्तर प्रदेश याठिकाणी कमी जास्त प्रमाणात आहे. शनिवारपर्यत अशी परिस्थिती या भागात असणार आहे. तसेच तीव्र स्वरूपाची पश्चिम- उत्तर दमट हवा अरबी समुद्रापासून पश्चिम किनारपट्टीवर रविवार पर्यत वाहणार आहे. तर उत्तर पश्चिम भारत आणि भारतातील मैदानी भागातही अशाच स्वरूपाचे वारे शुक्रवारपासून वाहतील. या प्रभावामुळे पाऊस सक्रिय होऊन मुसळधार स्वरूपात तो गुजरात राज्य, पश्चिम किनार पट्टी आणि महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात पडेल.

कोरोनाचा महिला डाॅक्टरांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम; महिला डाॅक्टरनं पत्राद्वारे सांगितला अनुभव.

सोमवारी रात्री मुसळधार पावसाची नोंद झाली. बुधवारी आयएमडीच्या सांताक्रूझ वेधशाळेमध्ये पहाटे 8.30 वाजता संपलेल्या 24 तासात 0.1 मिमी पावसाची नोंद झाली. त्याच काळात कुलाबा वेधशाळेत 0.2 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. नैऋत्य मॉन्सूनने 14 जूनला मुंबईला व्यापून टाकलं होतं, मात्र शहरात अद्याप मुसळधार पाऊस झालेला नाही. आतापर्यंत मुंबईत 18 जूनला फक्त एकदाच जोरदार पाऊस पडला आहे.

कुलाबा वेधशाळेनुसार 30 जूनपर्यंत (सकाळी 8.30) 540.9 मिमीच्या आवश्यक सरासरीपेक्षा 16.4 मिमी अशी एकूण 524.5 मिमी पावसाची नोंद झाली. त्यात जून महिन्यात 16 पावसाचे दिवस नोंदवले गेलेत. त्याचकाळात, सांताक्रूझ वेधशाळेत 395 मिमी पावसाची नोंद झाली. 505 मिमीच्या आवश्यक सरासरीपेक्षा 110 मिमी कमी आणि 14 दिवस पावसाची नोंद झाली.