वीज पुरवठा खंडीत झाल्याने रुग्णालयाना तातडीने जनरेटर आणि इंधन पुरविण्याचे आदेश; महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल

तुषार सोनवणे
Monday, 12 October 2020

वीज पुरवठा सुरळीत होण्यास एक तास लागण्याची शक्यता असल्याचे उर्जामंत्री नितिन राऊत म्हटले आहे.

मुंबई - वीज पुरवठा करणाऱ्या ग्रीड मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई महानगर प्रदेशातील परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली असून मुंबई विद्यापीठाच्या परिक्षेलाही याचा फटका बसला आहे. वीज पुरवठा सुरळीत होण्यास एक तास लागण्याची शक्यता असल्याचे उर्जामंत्री नितिन राऊत म्हटले आहे.  दरम्यान, मुंबईचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी रुग्णालयातील परिस्थितीबाबत माहिती दिली आहे.

जातीय आरक्षणांसाठी महाराष्ट्रात तलवारी उपसण्याची भाषा सुरू: सामना

रुग्णालयाना तातडीने जनरेटर आणि इंधन पुरविण्याचे आदेश महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहे .किमान आठ तास पुरेल इतका इंधन साठी करुन ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे.विशेषता आयसीयू सेवेत खंड पडू न देण्याचे आदेश देण्यात आले आहे. 

महापारेषणच्या 400 KV कळवा पडघा GIS केंद्रात सर्किट 1 देखभाल-दुरुस्ती सुरू होती. यावेळी सर्व भार सर्किट 2 वर होता. मात्र सर्किट 2 मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने  मुंबई व ठाणे मधील बहुतांश भाग प्रभावित आहे. अशी माहिती उर्जामंत्री नितिन राऊत यांनी दिली आहे.

'एमएमआर' क्षेत्रातील वीज पुरवठा खंडित रेल्वे सेवा विस्कळीत; विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा खोळंबा

सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास  टाटा कंपनीच्या ग्रीडमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते बोरिवली दरम्यानची लोकल सेवा ठप्प झाली आहे आहे. दुरुस्तीचे काम वेगाने सुरू असून लवकरच रेल्वे सेवा पूर्ववत होईल, असे पश्चिम रेल्वेने सांगितले.  दरम्यान, बोरिवली ते विरार मार्गावरील लोकल सेवा सुरळीत सुरू असल्याचेही पश्चिम रेल्वेने सांगितले.

---------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Orders to supply generators and fuel to the hospital immediately due to power outage Municipal Commissioner Iqbal Singh Chahal