लॉकडाऊन काळात अवयवदानाला ब्रेक! 70% घट झाल्याची 'झेडटीसीसी'ची माहिती

लॉकडाऊन काळात अवयवदानाला ब्रेक! 70% घट झाल्याची 'झेडटीसीसी'ची माहिती

मुंबई : कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनचा फटका अवयवदानाला ही बसला आहे. त्यामुळे, कोरोनाला न घाबरता अवयव दानासाठी पुढाकार घेतला पाहिजे. अनेक रुग्ण आजही अवयव दानाच्या प्रतिक्षेत आहेत. मार्च 2019 ते जुलै 2019 या काळात एकूण 33 दात्यांनी अवयव दान केले होते. त्यातून, 59 किडनी,28 यकृत, 12 हृदय, फुप्फुस 6 हे अवयवदान केले होते. मात्र, यंदाच्या 2020 च्या मार्च ते जुलै महिन्यात फक्त 10 अवयव दात्यांनी अवयव दान केले. त्यात एकूण 20 अवयवांचे दान झाले आहे. यात किडनी 14, यकृत 10 , हृदय 1 , फुप्फुस 1, स्वादु पिंड  1 तर 1 छोटे आतडे असे दान झाले आहे. त्यामुळे, गेल्या वर्षी च्या तुलनेत यंदा अवयवदानात 70 टक्क्यांनी घट झाल्याचे अवयवदान समिती कडून सांगण्यात आले आहे. 

अवयवदानासाठी नियमावली - 
मुंबईत मूत्रपिंड, यकृत, हृदय, फुफ्फुस, स्वादुपिंड या गंभीर आजारांमुळे ग्रस्त सुमारे 4000 रुग्ण अवयवदानाच्या प्रतीक्षेत आहेत. अवयव प्रत्यारोपण हा त्या रुग्णांचे प्राण वाचवण्याचा एकमात्र मार्ग आहे, परंतु कोरोना साथीच्या आजारामुळे या कामात मोठा अडथळा निर्माण केला आहे. झेडटीसीसीकडून मिळालेल्या माहितीनुसार, अवयवदानात सुमारे 70% घट झाली आहे. या कोरोना कालावधी दरम्यान, अवयव प्राप्तकर्त्यास एकाही संक्रमित व्यक्तीचा अवयव मिळालेला नाही किंवा प्रत्यारोपणाच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान त्याला संसर्ग होऊ नये यासाठी आरोग्य संचालनालय आणि झेडटीसीसीने देखील मानक ऑपरेटिंग सिस्टम (एसओपी) तयार केली आहे. 

झेडटीसीसीचे अध्यक्ष डॉ. एसके माथुर यांनी सांगितले की, आमचा लढा अदृश्य असलेल्या शत्रूविरुद्ध चालला आहे. आतापर्यंत यासाठी कोणतेही औषध आले नाही. 
आपण आपला एसओपी बदलला पाहिजे ही काळाची गरज आहे. त्यामुळे, संपूर्ण देशातील एकमेव झेडटीसीसीने असे एसओपी तयार केले जे अगदी सुरक्षित आहे. आता अवयव दानासाठी लोकांना पुढे येण्याची गरज आहे आणि इतरांना नवीन जीवन देणे गरजेचे आहे. नाहीतर कोरोना आजाराने नव्हे तर यकृत, हृदय आणि मूत्रपिंडाच्या गंभीर आजाराने बर्याच लोकांना जीव गमवावा लागेल. 

झेडटीसीसीचे सदस्य आणि किडनी ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. भरत शहा म्हणाले, की कोरोना काळात झालेल्या पहिल्या अवयवदानापासून आम्ही खूप चांगले काम करत आहोत. माझे जनतेला आवाहन आहे की जे लोक दुर्दैवाने आपले लोक गमावत आहेत ते अवयव दानाचा निर्णय घेऊ शकतात आणि या कोरोना कालावधीतील इतर लोकांचे जीवन वाचवू शकतात.


काय आहे नवीन एसओपी? 

* दात्याची (ब्रेन डेड व्यक्ती) स्वाब चाचणी, छातीचे सिटी स्कॅन आणि संपुर्ण इतिहास घेणे अनिवार्य असेल.

* दाता आणि कौटुंबिक इतिहास घेतला जाईल. त्यांना कोरोनाचा संसर्ग होता? ते बाहेर प्रवास करून परत आले होते का? ते उच्च जोखमीच्या संपर्कात आले होते का? इतर प्रश्न विचारले जातील. जर एखाद्याला संसर्ग होऊन बरे होऊन 28 दिवस पूर्ण झाले तरच त्याचा अवयव घेतला जाईल.

रुग्णालयासाठी एस.ओ.पी.-

रुग्णालयात स्वतंत्र प्रत्यारोपणाचे पथक असणे बंधनकारक आहे. डॉक्टर किंवा नर्स किंवा वॉर्ड बॉय किंवा रुग्णवाहिका चालक किंवा सफाई कर्मचारी असो सर्वांची नियमित तपासणी आवश्यक आहे.

प्रत्यारोपणाच्या कार्याशी संबंधित कोणताही सदस्य लक्षणात्मक असेल किंवा सकारात्मक आला असेल तर त्याला 28 दिवस त्या टिममधून बाहेर ठेवणे बंधनकारक असेल. पूर्णपणे बरे झाल्यानंतरच तो पुन्हा काम करेल. 

अवयव प्रत्यारोपणाच्या रूग्णांना रुग्णालयात स्वतंत्र वॉर्डमध्ये ठेवावे जेणेकरुन इतर रुग्णांकडून संसर्ग होण्याचा धोका नाही.

29 संक्रमणमुक्त प्रत्यारोपण

मार्च ते जुलै या कालावधीत मुंबईत 10 कॅडर दान करण्यात आले असले तरी, त्यांच्याकडून मिळालेल्या 29 अवयवांचे नवीन एसओपीनंतर यशस्वीरित्या गरजूंमध्ये प्रत्यारोपण केले गेले. चांगली गोष्ट अशी आहे की या सर्व प्रत्यारोपणांमध्ये कोरोनाचा संसर्ग झाला नाही. 

रूग्णालयांना धोका नको -

मुंबईत एकूण 39 रुग्णालये प्रत्यारोपणासाठी नोंदणीकृत आहेत, मात्र, केवळ 13 रुग्णालये प्रत्यारोपणाचे काम करत आहेत. 19 रुग्णालयांनी प्रत्यारोपण न करण्याचा निर्णय घेतला आहे. तर 6 रुग्णालयाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. झेडटीसीसीच्या एका अधिकार्याने सांगितले की, आजकाल अनेक रुग्णालये कोविड रुग्णांवर उपचार करत आहेत, म्हणून कोणालाही धोका घ्यायचा नाही. 

दात्यांनी संयम बाळगा -

सामान्यत: अवयव प्रत्यारोपणाची संपूर्ण प्रक्रिया 1 ते दीड दिवसात पूर्ण केली गेली जाते परंतु, आता प्राप्तकर्त्याची सुरक्षा लक्षात घेऊन एक नवीन एसओपी तयार केली गेली आहे. त्यामुळे आता ही संपूर्ण प्रक्रिया दोन ते अडीच दिवसांपर्यंत होते. अशा परिस्थितीत दात्याच्या कुटुंबाने संयम बाळगला पाहिजे आणि रुग्णालये किंवा झेडटीसीसीवर त्वरित कार्य करण्यास दबाव आणू नये. कौटुंबिक संयम इतरांना नवीन जीवन देऊ शकतो.

------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com