Organ Donation : जिवंत अवयवदान प्रक्रिया सुलभ,आबिटकर जनजागृती मोहीम राबवून सकारात्मक वातावरण निर्माण करणार
Prakashrao Abitkar : जिवंत अवयवदानासाठीची परवानगी प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी विभागीय समित्यांना सूचना देण्यात आल्या असून, जनजागृती मोहीम राबवून सकारात्मक वातावरण निर्माण केले जाणार आहे, असे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.
मुंबई : अवयव प्रत्यारोपणासाठी आवश्यक रुग्णालय नोंदणी प्रक्रिया सुलभ आणि तत्काळ करतानाच विभागीय प्राधिकरण समित्यांकडून जिवंत अवयवदान परवानगी प्रक्रियेला सुलभ केले जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.