रायगड जिल्ह्यात स्पायलेलिंग व्हाइट माशीचा प्रादुर्भाव; नारळाच्या उत्पन्नाला फटका

रायगड जिल्ह्यात स्पायलेलिंग व्हाइट माशीचा प्रादुर्भाव; नारळाच्या उत्पन्नाला फटका


अलिबाग :  रायगड जिल्ह्यात नारळाच्या झाडांना स्पायलेलिंग व्हाइट फ्लाय  (Spiraling White Fly)म्हणजेच पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव झाल्याने बागायतदारांना नारळांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागणार आहे. या किडीची गेल्या काही दिवसांपासून नारळाच्या झाडांबरोबर सुपारीच्या झाडांवरही वाढ होत असून त्यावर नियंत्रण ठेवणे बागायतदारांना कठीण होत आहे. पांढऱ्या माशीच्या प्रादुर्भावाचा दीर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता असून उत्पादनामध्ये घट होण्याची भीती व्यक्त होत आहे.

रायगड जिल्ह्यात नारळाचे पीक, अलिबाग, मुरुड, रेवदंडा, दिवेआगर या भागात मोठ्याप्रमाणात घेतले जाते.  मात्र, गेल्या काही दिवसांपासून नारळावर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. ही कीड   पानाच्या खालच्या बाजूला गोल रिंगणामध्ये अंडी घालत असून त्याचा झपाट्याने प्रसार झाला आहे. या किडीमुळे पानाच्या पृष्ठभागावर बुरशी वाढत असल्याने पानाच्या प्रकाश संश्लेषण क्रियेवर परिणाम होतो. त्यामुळे अन्ननिर्मितीच्या कामात अडथळा निमार्ण होत आहे. तसेच या किडीकडून पानांमधून पौष्टिक द्रव्य शोषले जात असल्याने नारळाच्या वाढीला आवश्यक असलेले द्रव्य व खाद्य कमी पडते. त्याचा परिणाम फळाच्या उत्पत्तीवर कालांतराने जाणवू लागतो. अनेक उपाय करुनही या माशीवर नियंत्रण मिळवता येत नसल्याने येथील बागायतदार मेटाकुटीला आले आहेत. विशेषतः नारळाच्या झाडांवर याचा प्रभाव दिसून येत आहे. यावर नियंत्रण कसे मिळवायचे यासाठी कोकण कृषि विद्यापिठाचे संशोधक यावर संशोधन सुरु आहे.   

पांढऱ्या माशीमुळे बागेतील इतर पिकांचेही नुकसान होते. नारळाच्या झाडावर या माशीचा प्रादुर्भाव जास्त दिसून येत आहे.  नुकसान कमी व्हावे यासाठी कोणत्या उपाययोजना करणे आवश्यक आहे, यासंदर्भात कोकण कृषि विद्यापिठाच्या संशोधकांचे मार्गदर्शन घेतले जात आहे.
- एस.आर. महालदार
सुपारी संशोधन केंद्र, श्रीवर्धन

नुकसानीचा प्रकार 
1 पांढरी माशीच्या प्रादुर्भावामुळे झाड मरत नाही. मात्र, झाडाच्या वाढीवर परिणाम होवू शकतो.
2 पांढरी माशीचे पिल्ले तसेच प्रौढ किटक झाडाच्या पानातील रस शोषतात. त्यामुळे नारळाची पाने ‍पिवळी व निस्तेज दिसतात.
3 पानांवर काळी बुरशी वाढल्याने झाडाला ताण बसू शकतो.  
4 पानांवर पडणारा गोड द्रव पदार्थामुळे नारळाच्या झावळ्यावर व नारळाखाली वाढणाऱ्या विविध झाडे व गवतावर काळ्या रंगाची “कॅप्नोडीयम” बुरशी वाढते.
5 कॅप्नोडीयम बुरशीमुळे झाडाच्या प्रकाश संश्लेषण क्रियेवर विपरीत परिणाम होतो.
6 पांढरी माशी वनस्पतीतील विषाणू प्रसाराचे देखील काम करतात.

Outbreak of Spiraling White Fly in Raigad District; Hit the coconut yield

------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com