नवी मुंबईत साथीचे रोग आटोक्यात; डेंगीचा एकही रुग्ण नाही; नागरिकांचे प्रबोधन केल्याचा परिणाम

शरद वाघदळे
Monday, 14 September 2020

पावसाळ्यामध्ये साथीच्या आजारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असते. त्यामुळे पालिका प्रशासन याबाबत जनजागृती करत असते.

वाशी : पावसाळ्यामध्ये साथीच्या आजारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असते. त्यामुळे पालिका प्रशासन याबाबत जनजागृती करत असते. या वर्षी मात्र नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार जानेवारी महिन्यापासून डेंगीचा एकही रुग्ण आढळला नसून, मलेरियाचे केवळ नऊ रुग्ण आढळले आहेत. डेंगी व मलेरियाचे रुग्ण वाढू नये, यासाठी पालिकेकडून दक्षता घेतल्याने या साथीच्या रोगांचा प्रभाव कमी असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.

मुंबईने मला खूप काही दिलं, आता न्यायही हवाय; कंगना रानौत राज्यपालांच्या भेटीला

दरवर्षी पावसाळ्यात हिवताप, डेंगी, तसेच इतर आजार वाढतात. यासाठी महापालिकेच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना व मोहिमा एप्रिलपासून नियमित स्वरूपात सुरू करतात. डास उत्पत्ती स्थाने नष्ट करण्याबरोबर रासायनिक धुरीकरणही करण्यात येते. आठवड्यातून दोनदा डासअळीनाशक फवारणी करण्यात येते. मात्र, या वर्षी पालिकेच्या आरोग्य विभागाने कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी कंबर कसली आहे. पालिका प्रशासनाने कोरोनाबरोबर साथरोग आजारांबाबतही दक्षता घेतल्याचा दावा केला असून त्यासाठी नागरिकांचे प्रबोधन केल्याने इतर साथीच्या आजारांचे प्रमाण कमी असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.

डास उत्पत्ती स्थानांची पावसाळ्यात राबवलेली मोहीम
5 लाख 35 हजार .... घरांना भेटी 
11 लाख 15 हजार 510 ... डास उत्पत्ती स्थानांची पाहणी 
3 हजार 147 .... डास उत्पत्ती स्थाने दूषित
1 हजार 574 स्थाने त्वरित नष्ट
1 हजार 573 ठिकाणी डासअळीनाशक फवारणी 

काय म्हणते आकडेवारी
 

आजार

2019 मध्ये 2020 ऑगस्टपर्यंत
ताप, खोकला, सर्दी 1 लाख 21 हजार 686 69 हजार 832
मलेरिया 52 9
डेंगी 7

एकही नाही

 

-------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Outbreaks under control in Navi Mumbai

टॉपिकस
Topic Tags: