मराठी अभिनेत्याच्या अटकेवरुन भातखळकर संतापले, शिवसेनेवर प्रहार

सोनियांच्या प्रभावामुळे शिवसेना राज्यात फॅसिझम राबवतेय काय?
Atul-Bhatkhalkar
Atul-Bhatkhalkar

मुंबई: राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी ठाण्यात मराठी कलाकाराला अटक करण्यात आली आहे. ठाण्यातील श्रीनगर पोलिसांनी मयुरेश कोटकर (mayuresh kotkar arrest) याला ताब्यात घेतलं आहे. मयुरेशला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. शिवसेना कार्यकर्त्यांनी याबाबत पोलिसात तक्रार केली होती. (over arrest of marathi artist mayuresh kotkar bjp mla atul bhatkhalkar slam shivsena)

मयुरेश कोटकर झालेल्या अटकेवरुन कांदिवलीतील भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी थेट शिवसेनेवर निशाणा साधला आहे. नवी मुंबई विमानतळ नामकरणावरून सुरु असलेल्या वादाशी संबंधित हा विषय आहे. "नवी मुंबई विमानतळ नामकरणावरून एकनाथ शिंदे यांच्या विरोधात फेसबुक पोस्ट केल्यावरून अभिनेत्याला अटक करण्यात आली आहे.याचा सरळ अर्थ विरोधात बोललात तर सरळ अटकच. सोनियांच्या प्रभावामुळे शिवसेना राज्यात फॅसिझम राबवतेय काय?" असा सवाल भातखळकर यांनी विचारला आहे.

Atul-Bhatkhalkar
शिवसेनेने हात जोडून हिंदू समाजाची माफी मागावी - राम कदम

काय आहे प्रकरण?

नवी मुंबईच्या विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देण्याची मागणी सध्या होत आहे. मयुरेशनेसुद्धा हीच मागणी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे. त्याने फेसबुकवर याबाबत अनेक पोस्टस केल्या आहेत. यातच एका आक्षेपार्ह पोस्टवरून त्याला अटक करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. मयुरेशला पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com