esakal | मुस्लिमांची नाव का टाकली? माझं नाव टाकायचं? - नाना पटोले
sakal

बोलून बातमी शोधा

Nana Patole

मुस्लिमांची नाव का टाकली? माझं नाव टाकायचं? - नाना पटोले

sakal_logo
By
वैदेही काणेकर

मुंबई: फोन टॅपिंगच्या (phone tapping issue) मुद्यावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष (congress state president) आणि आमदार नाना पटोले (nana patole) यांनी आज सभागृहात जोरदार हल्लाबोल केला. "२०१७-२०१८मध्ये फोन टॅपिंग केले गेले, हे कोणाच्या आदेशाने झालं?" असा प्रश्न नानांनी विचारला. "आता साखर कारखान्यांच्या (sugar mill) तक्रारीचं सुरु झालं आहे. विदर्भात गडकरींच्या दोन सारख कारखान्यांविरोधात तक्रारी केल्या आहेत. तपास करा, असं त्यांचेच लोक पत्र देत आहेत" असा दावा पटोले यांनी केला. (Over phone tapping issue nana patole raise important questionsnana patole raise important questions)

"माझा सरळ सवाल आहे, मुस्लिमांची नाव का टाकली? माझं नाव टाकायचं? हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करुन धर्माच्या नावाने राजकारण करुन, राज्य पेटवायच उद्देश आहे का?" असा जळजळीत प्रश्न नानांनी विचारला. कोणाकोणाचे फोन टॅप केले? याची सविस्तर माहिती, सूत्रधार समजला पाहिजे, असे नाना पटोले म्हणाले.

हेही वाचा: भाजपचे आमदार कोर्टात गेले तरी काही उपयोग नाही- छगन भुजबळ

"अधिकारी करेल असं होतं नाही. शासनाची मान्यता घ्यावी लागते. माजी गृहमंत्री सांगत होते. आमच्या मंत्र्याचं फोन टॅपिंग केलं. महाराष्ट्रात कधी असं बदल्याचं राजकारण झालं नाही. भास्कर जाधवांना सभागृहात धमकी देतात, तुमचा अनिल देशखुख करु, बाहेर भुजबळ करु सांगतात. राजीव सापते आत्महत्या प्रकरणी त्या संघटनेत काही भाजपचे लोक आहेत. आपला फिल्मसिटी उद्योग जाणार अशी चर्चा आहे. दिग्दर्शकांकडून अवैध वसुली केली जाते. राजू सापतेच्या प्रकरणात कडक नाही, त्यापेक्षा मोठी कारवाई करायची आहे. ज्या आमदाराचं नाव या प्रकरणात पुढे येतंय, त्या बाबत कारवाई झाली पाहिजे" अशी मागणी नाना पटोले यांनी केली.

loading image