मुंबईतील रूग्णालयात ऑक्सिजन पार्क; शुद्ध हवा आणि नैसर्गिक प्राणवायू निर्माण करण्यासाठी प्रयत्न

मुंबईतील रूग्णालयात ऑक्सिजन पार्क; शुद्ध हवा आणि नैसर्गिक प्राणवायू निर्माण करण्यासाठी प्रयत्न

मुंबई  : मुंबईतील रूग्णालयांत शुद्ध हवा आणि नैसर्गिक प्राणवायू निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी राज्य सरकारच्या सेंट जॉर्ज आणि जीटी रूग्णालयातील आवारात ऑक्सिजन पार्क उभारण्याची चाचपणी करण्यात येणार आहे. वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांनी बैठक घेऊन संबंधित अधिका-यांना याबाबतचे निर्देश दिले आहेत. मुंबईत सेंट जॉर्ज, जीटी, जेजे, कामा ही राज्य सरकारची प्रमुख मोठी रूग्णालये आहेत. या रूग्णालयांत राज्यभरातील रूग्ण उपचारासाठी येत असतात. त्यामुळे य़ा रूग्णालयांत नेहमीच रूग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांची गर्दी असते. शिवाय या रूग्णालयांना वाढत्या नागरि वस्तीने घेरले आहे. बाहेर वाहनांच्या वाढत्या संख्येने प्रदुषणाचा मोठा सामना करावा लागतो. त्यावर उपाय म्हणून नैसर्गिक ऑक्सिजन पार्क उभे करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 

सेंट जॉर्ज आणि जीटी रूग्णालयात ऑक्सिजन पार्क उभारण्याचे विचाराधिन आहे. या रूग्णालयांत मोठ्या प्रमाणात मोकळ्या जागा असून या मोकळ्या जागांवर तुळस, कडूलिंब, पिंपळ यांसारखी ऑक्सिजन तसेच हवा शुद्ध करणारे रोपे लावून रूग्णालय परिसरात नैसर्गिकरित्या ऑक्सिजनची पातळी वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.  राज्यातील हा पहिला ऑक्सिजन पार्क ठरणार आहे.  
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण आणि वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात मंगळवारी विशेष बैठक पार पडली. य़ा बैठकीत राज्य सरकारच्या मुंबईतील रूग्णालयांच्या समस्या तसेच अडचणींचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला सर जेजे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रणजीत मानकेश्वर, सेंट जॉर्जेस रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक अशोक खोब्रागडे, जीटी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. चिखलकर, कामा व आल्बेस रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पालवे, सर जे जे समूह रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे आणि वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले आदि अधिकारी उपस्थित होते.

जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्वोतोपरी प्रयत्न सरकारच्यावतीने सुरू आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाने मुंबईस्थित रुग्णालयांच्या सुविधा वाढविण्यावर भर द्यावा अशा सूचना केल्या आहेत. ऑक्सिजन पार्क हा त्याचाच एक भाग असून त्यावर उचित कार्यवाही करण्याच्या सूचना आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
राजेंद्र यड्रावकर ,
राज्यमंत्री , सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण

Oxygen Park at Mumbai Hospital Efforts to create clean air and natural oxygen

--------------------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com