Paduka Darshan Sohala 2024 : गुरुसेवकांची श्री एम यांच्या पुस्तकांना पसंती; विविध स्टॉलवर खरेदीसाठी मोठा प्रतिसाद

श्रीगुरू पादुका सोहळ्यात आलेल्या गुरुसेवकांनी पुस्तके आणि ऑरगॅनिक फूडला पंसती दिली. त्यातही श्री एम गुरुजी यांच्या पुस्तकांना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे दिसून आले.
Paduka Darshan Sohala 2024 sri family guide initiative Sri M books Huge response for shopping at various stalls
Paduka Darshan Sohala 2024 sri family guide initiative Sri M books Huge response for shopping at various stallsSakal

नवी मुंबई : श्रीगुरू पादुका सोहळ्यात आलेल्या गुरुसेवकांनी पुस्तके आणि ऑरगॅनिक फूडला पंसती दिली. त्यातही श्री एम गुरुजी यांच्या पुस्तकांना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे दिसून आले.

वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये दोनदिवसीय श्रीगुरू पादुका दर्शन सोहळा पार पडला. यात विविध स्टॉल लावण्यात आलेले होते. ‘सकाळ’ प्रकाशनची पुस्तके, फेथ फूड ऑरगॅनिक इंडिया, विक्रम चहा, द सत्संग फाऊंडेशन, संतुलन आयुर्वेद, अग्निहोत्र आदी स्टॉल येथे सजले होते.

या सर्व स्टॉलवर येथे आलेल्या गुरुसेवकांनी मोठी गर्दी केली. ‘सकाळ’ प्रकाशनच्या स्टॉलवर श्री एम गुरुजी यांच्या पुस्तकांना जास्त मागणी असल्याचे दिसून आले. तसेच फेथ फूड ऑरगॅनिक इंडिया आणि विश्‍व अग्निहोत्र स्टॉलमध्ये उपलब्ध असलेल्या पदार्थांनाही गुरुसेवकांनी पसंती दर्शवली.

यात तूप, मध, लाल तांदूळ, इंद्रायणी तांदूळ, भरड धान्य इत्यादी पदार्थ ठेवण्यात आले. गुरुसेवकांनी मोठ्या प्रमाणात याची खरेदी केली. मुंबई येथे आध्यात्मिक गुरू श्री एम यांचे सत्संग फाऊंडेशन आहे. तेथे मी काम करतो.

कैद्यांना शिकवणे, पालिका शाळांतील विद्यार्थ्यांचे कौशल्यविकास, योगासने, आयुष्य कसे जगायचे ते शिकवतो. यानंतर आम्ही ‘कचरामुक्त मुंबई’ असा प्रकल्प सुरू करत आहोत. काही शाळा, कॉलेजमध्ये प्लास्टिकविरोधी जनजागृती केली जाते. नदी, नाले, समुद्रात प्लास्टिक टाकणे बंद करण्यासाठी आमचे काम सुरू आहे. श्री एम नेहमी सांगतात, ‘झाडांशी मैत्री करा’. त्यांचे असे म्हणणे आहे की, पाणी आणि वृक्षवल्ली वाढली तरच पृथ्वी टिकेल.

- धनेश जुकर, सत्संग फाऊंडेशन

श्रीगुरू पादुका दर्शन उत्सवात संतुलन आयुर्वेद यांच्यातर्फे स्टॉल लावलेला होता. संतुलन आयुर्वेदच्या स्टॉलवर केस गळती, पित्त, लहान मुले, गर्भवती तसेच विविध आजारांवर आयुर्वेदिक औषधे ठेवलेली आहेत. लहान बाळांसाठी ‘बाल अमृत’ आहे. पांढरे काजळ, काळे काजळ तसेच आजारांवर विविध औषधे ठेवण्यात आली आहेत.

- अभिषेक देशपांडे, मार्केटिंग प्रमुख, संतुलन आयुर्वेद

मुंबईत दिवसेंदिवस ऑरगॅनिक जागरुकता वाढत आहे. पादुका सोहळ्यामध्ये भाविकांना ऑरगॅनिक फूड उपलब्ध झाले आहे. त्याला चांगली पसंती मिळत असून विशेषतः घी, मध, लाल तांदूळ, इंद्रायणी तांदूळ, भरड धान्य यांची जास्त विक्री होत आहे.

- अक्षय भिंगारे, फेथ फूड ऑरगॅनिक इंडिया

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com